चुलत्याचा धाक जोरात, पुतण्याचा पाय खोलात; विधानसभेला रोहित पाटील अडचणीत येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 03:56 PM2022-04-23T15:56:27+5:302022-04-23T16:18:41+5:30

आर.आर.आबांच्या पश्चात त्यांचे धाकटे बंधू सुरेश पाटलांनी गटाच्या चाव्या हातात घेतल्या. पण, त्यांनी आबा गटाच्या विरोधकांशीच परस्पर 'सेटलमेंट' केल्याच्या तक्रारी घरापर्यंत आल्या. भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि आबांच्या गटांच्या कार्यकर्त्यांनी एकेकाळी एकमेकांची डोकी फोडली होती.

Rohit Patil will face difficulties in Tasgaon Kavthemahankal assembly elections | चुलत्याचा धाक जोरात, पुतण्याचा पाय खोलात; विधानसभेला रोहित पाटील अडचणीत येणार?

चुलत्याचा धाक जोरात, पुतण्याचा पाय खोलात; विधानसभेला रोहित पाटील अडचणीत येणार?

Next

श्रीनिवास नागे

आर.आर.आबांच्या पश्चात त्यांचे धाकटे बंधू सुरेश पाटलांनी गटाच्या चाव्या हातात घेतल्या. पण, त्यांनी आबा गटाच्या विरोधकांशीच परस्पर 'सेटलमेंट' केल्याच्या तक्रारी घरापर्यंत आल्या. भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि आबांच्या गटांच्या कार्यकर्त्यांनी एकेकाळी एकमेकांची डोकी फोडली होती. आता सुरेश पाटलांनी काकांशी छुपी हातमिळवणी केली. त्यामुळं घरात कुरबुरी झाल्या म्हणे! पण रोहित यांना चुलत्यांचं बोट सोडता नाही आलं. चुलत्यांचा धाकच तसा आहे म्हणे. परिणामी तासगाव कवठेमहांकाळमधून रोहित अडचणीत येणार असल्याचं राष्ट्रवादीतून बोललं जातंय.

आबांच्या गटाचे नेते म्हणून सुरेश पाटलांना जिल्हा बँकेचं संचालक पद दोनदा देण्यात आलं. त्यांनी तडजोडी निमूटपणानं स्वीकाराव्यात, हाच उद्देश त्यांना बँकेवर घेणाऱ्यांचा होता, त्यानुसार त्यांनी गट वाढवला नाही, उलट आबांचे विश्वासू साथीदार हळूहळू काका आणि जयंतरावांच्या तंबूत कसे जातील, हे पाहण्यात समाधान मानलं. संजयकाकांचे चुलत बंधू अविनाश पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. राजकारणात या चुलत भावांचं एकमेकांशी पटत नाही. विशेष म्हणजे सुरेश पाटलांचंही अविनाशकाकांशी जमत नाही.

आबांच्या पश्चात जयंतरावांनी तासगाव-कवठेमहांकाळला स्वत:च्या गटाची बांधणी सुरू केली. आबा असताना ते जमलं नव्हतं. आता मणेराजुरी, विसापूर, बोरगाव, सावळज, तुरची या मोठ्या गावांतले राष्ट्रवादीचे नेते अंजनीऐवजी इस्लामपूरला कामं घेऊन जातात. ही फळी काही वर्षांपूर्वी आबांच्या अवतीभवती झुलायची. आबांच्या निवडणुका सांभाळायची. आता हा गट जयंतरावांकडं गेलाय. तो कुणाला निवडून आणायचं यापेक्षा कुणाला पाडायचं, हे ठरलू शकतो, इतका 'पॉवरफुल कवठेमहांकाळ तालुक्यात काकांनी आधीच आबा गट फोडला होता. अलीकडं सारे गटही वेगळा झालाय तो आणि अर्जितराव घोरपडे गट जयंतरावांच्या इशाऱ्यावरच चालेल. त्यामुळे या मतदारसंघात जयंतरावांनी डोळा मारला, तर 'करेक्ट कार्यक्रम ठरलेलाच

विधानसभेला संजयकाकाच उतरले तर..?

प्रतीक पाटील यांना लोकसभेला उभं करायचं ठरलं तर किंवा भाजपमधली समीकरणं बदलली तर संजयकाका पाटील तासगाव-कवठेमहांकाळमधून विधानसभा लढवतील, तेव्हा रोहित यांना निकराची झुंज द्यावी लागेल. आबा-काकांच्या संघषपिक्षा तो अधिक घातक ठरेल. तेव्हा जयंतरावांच्या आणि सुरेश पाटलांच्या गटातली मतं कुणाकडं जातील, हा नवा प्रश्न, 'गेम' फसली, तर राष्ट्रवादीतलाच नेता फोडून बंड करायला लावलं जाईल. तो आबा गटाचीच मतं खाईल आणि कहाणी 'सुफळ संपूर्ण' होईल...

काका शिरजोर की पुतण्या सवाई

पेशवाईतला नारायणराव काका, मला वाया म्हणून राघोबादादाकडं पळत सुटला होता, तरटर्टी आणि नंतर काय घडलं, हे सर्वश्रुत आहे. इथल्या राजकारणातही चुलत्या-पुतण्याच्या जोड्या चर्चेत आल्या. वसंतदादा-विध पाटील, अस्ट उदयनराजे भोसले, गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे ही पवार-अजित पवार, अभयसिंहराजे भोसले. वानगीदाखल नायं. त्यांच्यात प्रेमही दिसले आणि शीतयुद्धही! कुठं चुलत्यांनी पुतण्याला दाबले, तर कुठं पुतण्या उसळी घेऊन सवाई ठरला. चिंचणीद माजी आमदार दिनकराबा पाटील यांचे पुतणे संजयकाका खासदार झाले. चुलत्याच्या मुलांना मागं टाकून सुसाट सुटले... सुरेश पाटील-रोहित पाटील या चुलत्या-पुतण्याच्या जोडीकट आता जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.

जाता- जाता - रोहित यांचं पालकत्व शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबानं घेतलंय, आबांच्या मुलाला अडचणीत असतील तर अजितदादा रोहितला झाडून सगळी मदत करतील, हेही नक्की

Web Title: Rohit Patil will face difficulties in Tasgaon Kavthemahankal assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.