तांदूळवाडी परिसरात घरांच्या छतांची डागडुजी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:46+5:302021-05-26T04:27:46+5:30
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील गावांमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांच्या छतांची डागडुजी करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. छताची ...
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील गावांमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांच्या छतांची डागडुजी करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. छताची डागडुजीसाठी लागणारे साहित्य लॉकडाऊनमुळे उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.
तांदूळवाडी परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगांव, भडकंबे, नागाव, कणेगांव, भरतवाडी आदी गावे येत आहेत. या गावांना पावसाचा मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. झाडे विद्युत तारा तर शेतातील विद्युत पुरवठा खांब व घरावरील छत होते. बरेच नागरिक या पार्श्वभूमीवर संरक्षण मिळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी घरांची छते व सुस्थितीत राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात राज्य विद्युत वितरण कंपनीने मागील महिन्यांपासून आपला विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अगोदरच खांबांची देखभाल व दुरुस्तीस सुरुवात केली आहे. घरांचे छते दुरुस्ती करण्याचे साहित्य ज्या दुकानात मिळत आहे, ती दुकाने लाॅकडाऊनने बंद आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त होत आहे.