कोरोनाने हिसकावलेल्या रोजीरोटीला मिळाली नवी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:25 AM2020-12-29T04:25:49+5:302020-12-29T04:25:49+5:30

शरद जाधव / लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोराेनाचा वाढता कहर...परिणामी सुरू झालेले लॉकडाऊन आणि शहराच्या रहाटगाड्यात अडकलेल्यांनी धरलेली ...

Rosario, who was snatched by Corona, got a new opportunity | कोरोनाने हिसकावलेल्या रोजीरोटीला मिळाली नवी संधी

कोरोनाने हिसकावलेल्या रोजीरोटीला मिळाली नवी संधी

Next

शरद जाधव / लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोराेनाचा वाढता कहर...परिणामी सुरू झालेले लॉकडाऊन आणि शहराच्या रहाटगाड्यात अडकलेल्यांनी धरलेली गावाची वाट यामुळे अनेकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले. लॉकडाऊन जसे वाढत गेले तशी अस्वस्थताही वाढत गेली. मात्र, याच कोरोनामुळे अनेक नवीन रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्याने अनेकजण आपल्या गावातच रमले तर गृहिणींनी संसाराला हातभार म्हणून सुरू केलेल्या रोजगारातून स्वत:ला आत्मनिर्भर बनवले.

लॉकडाऊनमध्ये घरातच अडकून पडलेल्या प्रत्येकाला तडजोड सहन करावी लागली. त्यामुळेच एरवी आठवडा बाजारात अथवा मंडईत मिळणारा भाजीपाला घरपोच मिळू लागला. अनेकांनी रोजगाराच्या नवीन वाटा धुंडाळताना घरपोच भाजीपाला देण्यास सुरूवात केली. अबालवृध्द घरातच अडकून पडल्याने खाण्याच्या फर्माईशीही वाढतच गेल्या. यातून लॉकडाऊन कालावधीत घरोघरी नवनवीन पदार्थांची रेलचेल सुरू झाली आणि यातूनच महिलांनी आपली रोजगाराची संधी शोधली. कोरोनाअगोदर फक्त बेकरीतच मिळणारा केक, आईसकेकचा व्यवसाय अनेकांना चार पैसे देऊन गेला.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हॉटेलिंगवर मर्यादा आल्याने अनेकांनी घरपोच जेवण पुरविण्याचेही व्यवसाय सुरू केले. ज्यांना अजूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य क्षेत्राचा थोडाफार अनुभव असणाऱ्यांनी घरपोच औषधे पाेहोच करण्याबराेबरच रूग्णांचे चाचणी अहवाल देण्याचा छोटासा व्यवसायही सुरू केला.

महिलांनी या कालावधीत मास्क तयार करण्याच्या नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. अगदी बचत गटांनीही त्यात सहभागी होत विक्रमी संख्येने मास्कची निर्मिती करून रोजगार वाढवला तर काहींनी कोरोना कालावधीत लागणाऱ्या पीपीई किटसह इतर संरक्षण साधनांची विक्री करत नवीन व्यवसायाला प्रारंभ केला.

चाैकट

गड्या आपला गावच बरा

शहरातच सिमेंटच्या जंगलात हरवलेल्या अनेकांना कोरोनामुळे गावाकडचे वातावरण खुणावू लागले आणि यातील अनेकांनी गावातच राहण्याचा निर्णय घेतला. शेतात नवनवीन प्रयोग करण्याबराेबरच किराणा दुकानांसह इतर व्यवसाय सुरू करत गावालाच आपले करून घेतले.

Web Title: Rosario, who was snatched by Corona, got a new opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.