कासेगावात एकरातील पपईवर फिरविला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:44 PM2019-12-22T23:44:22+5:302019-12-22T23:45:13+5:30

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील एका शेतकऱ्याने विक्रीसाठी पाठविलेली ४ टन पपई संबंधित व्यापाºयाने मालाची आवक जास्त असल्याचे ...

Rotated rotor on a papaya in Kasegawa | कासेगावात एकरातील पपईवर फिरविला रोटर

कासेगाव (ता. वाळवा) येथील शेतकरी विश्वनाथ बाबूराव वगरे यांनी उत्पादित पपई अशा रस्त्यावर टाकून दिल्या.

Next

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील एका शेतकऱ्याने विक्रीसाठी पाठविलेली ४ टन पपई संबंधित व्यापाºयाने मालाची आवक जास्त असल्याचे कारण देऊन घेण्यास नकार दिला. अन्य कोणत्याही ठिकाणी खरेदीदार न मिळाल्याने नाराज होऊन शेतकºयाने ती पपई रस्त्यावर फेकून दिली. नैराश्येतून या शेतकºयाने
१ एकरातील उर्वरित पपईच्या पिकावर रोटर फिरवून सर्व पीकच जमीनदोस्त केले.
कासेगाव येथील विश्वनाथ बाबूराव वगरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी कर्ज काढून शिदाचा माळ येथील एक एकर शेतजमिनीत पपईची लागवड केली होती. मोठ्या कष्टाने त्यांनी पपईची बाग जोमाने पिकवली होती. त्यासाठी लागवड, पाणी, औषधे, मजूर यासाठी सुमारे
१ लाखापेक्षा जास्त खर्च केला होता. त्यामुळे फळधारणाही चांगली झाली होती.
मुंबई, पुणेच्या बाजारपेठेत पपईला मागणी व दरही चांगला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पपई तोडणीस त्यांनी सुरुवात केली होती. मात्र अचानक बाजारपेठेत पपईचा दर खूपच कमी झाला. पाठविलेल्या मालातून वाहतूक खर्चही मिळत नसल्याने त्यांनी सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील स्थानिक व्यापाऱ्यांना २ रुपये किलो दराने ६ टन पपईची विक्री केली. चार दिवसांपूर्वी एका व्यापाºयाला विचारून पपईची तोडणी केली. ४ टन पपई संबंधित व्यापाºयाला पाठविल्या. मात्र जास्त मालाची आवक झाल्याचे कारण देऊन त्याने तो माल उतरवून घेण्यास नकार दिला. शेतकºयाने वारंवार विनंती करूनही तो माल व्यापाºयाने खरेदी केला नाही.
त्यानंतर विश्वनाथ वगरे यांनी इतर ठिकाणी कोणी व्यापारी हा माल घेते का ते पाहिले. पण स्थानिक कोणीच घ्यायला तयार नव्हते. मुंबई, पुणे येथील वाहतूक खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने, तिकडे पपई पाठवून तोटाच होणार हे लक्षात आले. या सर्व नैराश्येतून भरलेली पपईची गाडी वगरे यांनी कासेगावात आणली आणि सर्व पपई रस्त्यावर ओतल्या. एवढेच नव्हे, तर एक एकरातील सर्व पपईची झाडे रोटरच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. सरकारने कर्जमाफी दिली, मात्र, शेतकºयांच्या मालाला हमीभाव दिला नसल्यानेच, अशी अवस्था सर्वत्र दिसून येत आहे.

Web Title: Rotated rotor on a papaya in Kasegawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.