जिल्हा बॅँकेच्या कर्जवाटपात १२९ कोटींची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:19 AM2017-07-20T00:19:52+5:302017-07-20T00:19:52+5:30

जिल्हा बॅँकेच्या कर्जवाटपात १२९ कोटींची घट

Rs 129 crore reduction in District Bank's debt | जिल्हा बॅँकेच्या कर्जवाटपात १२९ कोटींची घट

जिल्हा बॅँकेच्या कर्जवाटपात १२९ कोटींची घट

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कर्जमाफीसाठी शासनाकडून थकबाकीची तारीख जून २०१७ पर्यंतची गृहीत धरली जाईल, अशी आशा बाळगलेले जिल्ह्यातील ४० हजार शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे नव्या कर्जासाठी ते अपात्र ठरले आहेत. या गोंधळात गतवर्षाच्या तुलनेत जिल्हा बॅँकेच्या एकूण खरीप पिकाच्या कर्जवाटपात यंदा १२९ कोटींची घट झाली आहे.
सांगली जिल्हा बॅँकेने १४ जुलैअखेर खरीप हंगामासाठी एकूण ३४३ कोटी ७९ लाख ५६ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत ४७२ कोटी ८६ लाख ३२ हजार कोटींचे कर्जवाटप झाले होते. यावर्षीचे खरीप उद्दिष्ट ५३६ कोटी ७० लाखांचे आहे. जून २०१६ पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व अन्य सवलतींच्या योजनेचा लाभ होणार आहे. जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही यात समाविष्ट करून घेतले जाईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे जून २0१६ ते जून २0१७ पर्यंत कर्जाचे हप्ते न भरलेले चाळीस हजारांवर शेतकरी थकबाकीत गेले आहेत. परिणामी ते नव्या कर्जासाठी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा १२९ कोटी रुपयांची घट कर्जवाटपात दिसून येते.
जिल्हा बॅँकेला उद्दिष्टपूर्तीसाठी अजूनही बराच कालावधी असल्याने बॅँकेला या गोष्टीने काही फरक पडणार नाही. याऊलट थकबाकीदार शेतकऱ्यांपुढील अडचणीत वाढ झाली आहे.
येत्या पंधरा दिवसांत थकबाकी जमा करून नियमित कर्जदारांच्या यादीत जाण्याची व २५ हजारांची सवलत मिळविण्याची त्यांना संधी मिळू शकते. याशिवाय नव्या कर्जासाठीही ते पात्र ठरणार आहेत. त्यामुळे अशा अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेने थकबाकी भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक कर्जपुरवठा १५६ कोटी १५ लाख ९७ हजार इतका करण्यात आला आहे. त्याखालोखाल द्राक्ष, सोयाबीन, ज्वारी या पिकांसाठी कर्जपुरवठा केला आहे. गतवर्षाच्या तुलनेत कर्जवाटपाचे आकडे कमी असले तरी, सप्टेंबरपर्यंत उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आता प्रशासनाने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांनी थकबाकी भरुन अनेक योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा ९७७ कोटींचे उद्दिष्ट
जिल्हा बँकेला यंदा खरीप व रब्बीचे एकूण पीक कर्ज उद्दिष्ट ९७७ कोटी रुपयांचे आहे. यामध्ये खरिपाचे ५३६ कोटी ७0 लाखांचे, तर रब्बीचे ४४0 कोटी ३0 लाखांचे उद्दिष्ट आहे. खरिपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास कोणतीही अडचण जिल्हा बँकेला वाटत नाही. तरीही त्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
पेरणी कर्जासाठी मागणी नाही
पेरणी कर्जासाठी जिल्हा बँकेने सर्व तयारी केलेली असताना, अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. दीड लाखावर ज्यांचे कर्ज आहे, अशा कर्जदारांनी दीड लाखाव्यतिरिक्त असणारी रक्कम भरल्याशिवाय तो कर्जास पात्र ठरत नाही. त्यामुळे दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्यासाठी उर्वरित रक्कम जमा करावी लागणार आहे. जिल्हा बँकेने शासनाच्या नियमांच्या आधारेच कर्जवाटपाचे धोरण राबविले आहे.
पीकनिहाय कर्जवाटप
पीक सभासद कर्ज
ऊस २५,५४९१५६,१५,९७,000
द्राक्ष ७,६८९१00,६५,८९,000
ज्वारी ६,0६१११,९0,५६,000
सोयाबीन३,६५0८,१४,४0,000
डाळिंब५,३१६ ३५,९८,९३,000
भात ४४६१,0७,८३,000
हळद ६४ २७,५९,000
भुईमूग४३३९६,५३,000
बाजरी १,६५१३,२१,६0,000
कापूस ९,0२११६,५५,२३,000

Web Title: Rs 129 crore reduction in District Bank's debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.