रिक्षाचालकांना १५०० रुपये मदतीची प्रक्रिया उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:26 AM2021-05-21T04:26:29+5:302021-05-21T04:26:29+5:30
सांगली : रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया शनिवारपासून (दि.२२) सुरू होत आहे. परिवहन आयुक्तांनी ही माहिती ...
सांगली : रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत देण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया शनिवारपासून (दि.२२) सुरू होत आहे. परिवहन आयुक्तांनी ही माहिती रिक्षा संघटनांना दिली.
लॉकडाऊनमध्ये चरितार्थाचा प्रश्न निर्माण झालेल्या रिक्षाचालकांसाठी शासनातर्फे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यभरातील रिक्षाचालकांच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले जातील. त्यासाठी संगणकीय यंत्रणा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. रिक्षाचालकाचा परवाना क्रमांक, रिक्षा क्रमांक व आधार क्रमांक ही माहिती या यंत्रणेत अपलोड करण्यात आली आहे. अनुदानासाठी रिक्षाचालकांनी या यंत्रणेवर आपला आधार, परवाना व वाहन क्रमांक भरायचा आहे. संगणकीय यंत्रणा तिची पडताळणी करेल. शासनाने भरलेल्या माहितीशी रिक्षाचालकाने भरलेली माहिती जुळली की तो अनुदानासाठी पात्र होईल. त्याच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या बँक खात्यावर पैसे जमा होतील. याव्यतिरिक्त अन्य कोणतीही कागदपत्रे जमा करायची नाहीत. शनिवारपासून रिक्षाचालकांना माहिती भरता येईल. या प्रक्रियेची ऑनलाइन चाचणी शुक्रवारी (दि.२१) होणार असल्याची माहिती सांगली जिल्हा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले यांनी दिली.