नवरत्न पतसंस्थेत आरटीजीएस सुविधा सुरू : सचिन चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:54+5:302021-07-03T04:17:54+5:30

नवरत्न पतसंस्थेच्या आरटीजीएस व एनईएफटी सेवेच्या उद्घाटन सुनील पाचोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिन चौगुले, सुधीर हालुंडे, प्रमोद कोरेगावे ...

RTGS facility launched at Navratna Patsanstha: Sachin Chowgule | नवरत्न पतसंस्थेत आरटीजीएस सुविधा सुरू : सचिन चौगुले

नवरत्न पतसंस्थेत आरटीजीएस सुविधा सुरू : सचिन चौगुले

Next

नवरत्न पतसंस्थेच्या आरटीजीएस व एनईएफटी सेवेच्या उद्घाटन सुनील पाचोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिन चौगुले, सुधीर हालुंडे, प्रमोद कोरेगावे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील नवरत्न नागरी पतसंस्थेने ग्राहकांसाठी खास आरटीजीएस व एनइएफटीची सेवा सुरू केली असल्याची माहिती संस्थापक सचिन चौगुले यांनी दिली.

या सेवेचे उद्घाटन सुनील पाचोरे व सुधीर हालुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय डांगे, उपाध्यक्ष संगीता कोरेगावे, संचालक प्रकाश मोरे, शुभांगी चौगुले, शशिकांत रावळ, सचिन कुकडे, संजय लिगाडे, संतोष थोटे, विजय कांबळे, संदीप आवटी, रोहित चौगुले, सचिव प्रमोद कोरेगावे, सहसचिव बाबासाहेब चौगुले व कर्मचारी उपस्थित होते.

सचिन चौगुले म्हणाले, संस्थेच्या ठेवी १३ कोटी ४० लाख, तर कर्जवाटप १० कोटी १३ लाख आहे. भाग भांडवल ५६ लाख ६८ हजार तसेच संस्था स्थापनेपासून ऑडिट वर्ग ‘अ’ आहे. संस्थेला आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर संस्थेने आष्टा व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक कर्जपुरवठा करून त्यांना सक्षम करण्याचे काम केले आहे. सध्या सोशल मीडियाचे युग असल्याने संस्थेने सभासदांसाठी आरटीजीएस व एनईएफटी सोय केली आहे. यामुळे सभासदांना ऑनलाईन पैसे पाठविण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

Web Title: RTGS facility launched at Navratna Patsanstha: Sachin Chowgule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.