रुद्र नाईकची स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 03:38 PM2022-06-30T15:38:46+5:302022-06-30T15:39:18+5:30

संजयनगर : सांगलीतील संजयनगर येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या रुद्र हिरेन नाईकने स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. ...

Rudra Naik sets world record in skating, Guinness Book of World Records | रुद्र नाईकची स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

रुद्र नाईकची स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

googlenewsNext

संजयनगर : सांगलीतील संजयनगर येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या रुद्र हिरेन नाईकने स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. सलग ९६ तास लार्जेस्ट रोलरस्केटिंग करून त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. इतक्या लहान वयात रुद्रने विश्वविक्रमी कामगिरी केल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रुद्र हा रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे. रुद्रने बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग अकॅडमी कडून आयोजित केलेल्या स्केटिंग या खेळ प्रकारात सलग ९६ तास लार्जेस्ट रोलरस्केट करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. यासाठी त्याला प्रशिक्षक प्रथमेश लोंढे, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी रुद्रचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी क्रीडा शिक्षिका प्रियांका देशमुख, संगीता सरगर, मगदूम हुसेन, वर्गशिक्षिका पूजा कारंडे, सीमा माळी, प्रवीण कांबळे, यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.

Web Title: Rudra Naik sets world record in skating, Guinness Book of World Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली