जतमध्ये लसीकरणावेळी नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:07+5:302021-07-02T04:19:07+5:30
जत शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही आटोक्यात येऊ लागली असतानाच आता तर येथील प्रशासनाच्या गोंधळाच्या कारभारामुळे कोरोना नियम ...
जत शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही आटोक्यात येऊ लागली असतानाच आता तर येथील प्रशासनाच्या गोंधळाच्या कारभारामुळे कोरोना नियम पायदळी तुडविण्याचे प्रकार समोर येत आहेत.
जत येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील स्व. श्रीमंत कीर्तिमालिनीराजे डफळे संकुलात कोरोना लस देण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे. परंतु, या ठिकाणी आरोग्य विभागाचे अधिकारी हजर नसतात. लस केव्हा येणार याची पूर्व कल्पना कर्मचाऱ्यांना नसल्याने नागरिकांना दिवसभर ताटकळत उभे रहावे लागत आहे.
या लसीकरण केंद्राकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना येथे सूचना देण्यासाठी कोणीही नसल्याने लसीकरण केंद्रात गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे.
चाैकट
पोलीसंची बघ्याची भुमीका
कोरोना लसीकरण केंद्रात पोलीस कर्मचारी हजर होते पण त्यांनीही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही समज दिली नाही. एरवी हेच पोलीस कर्मचारी बाजारपेठेत लोकांनी गर्दी केली तर त्यांना कायदा शिकवितात मग अशावेळी यांचा कायदा काय करतो असा सवाल ही काही नागरिकांनी माध्यमांशी बोलताना केला.
010721\img-20210701-wa0048.jpg
लसीसाठी सामाजिक अंतराची ऐशी की तैशी