सदाभाऊंची घोडदौड शेट्टी-जयंतरावांनी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:19 AM2017-09-07T00:19:47+5:302017-09-07T00:19:47+5:30

Sadabhau jhodode Shetty-Jayantrao stopped | सदाभाऊंची घोडदौड शेट्टी-जयंतरावांनी रोखली

सदाभाऊंची घोडदौड शेट्टी-जयंतरावांनी रोखली

Next



अशोक डोंबाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील घोडदौड रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी खासदार राजू शेट्टीसमर्थक सदस्याला जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत मदत केली. या खेळीला भाजपमधील नाराज गटानेही बळ दिल्याचे दिसत आहे. शेट्टी-जयंतराव गट्टीमुळे इस्लामपूर, शिराळा विधानसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची चर्चा रंगली आहे.
बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद गटातून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांचा पराभव झाल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दुफळी चव्हाट्यावर आली. खा. शेट्टी आणि खोत यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. खोत यांची संघटनेतून हकालपट्टी झाली आहे. खोत यांचे वर्चस्व वाढत असल्याने, त्यांना शह देण्याची खेळी नियोजन समितीच्या निवडणुकीद्वारे खेळण्यात आली. सदाभाऊ खोत यांना विरोध करण्यासाठी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ याप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका करणे टाळले आहे. शेट्टी कसे बरोबर आहेत, याबाबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दाखले दिले. शेट्टी-जयंतराव यांचे सूर जुळू लागल्यामुळे लोकसभेला शेट्टी आणि विधानसभेला जयंतराव, अशी चर्चा कार्यकर्त्यांत आहे. यालाच पुष्टी देणारी खेळी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत झाली. सदाभाऊंची घोडदौड राष्ट्रवादीच्या मुळावर असल्यामुळे, त्यांना रोखण्यासाठी जयंत पाटील सक्रिय आहेत. इस्लामपूर पालिका, जि. प. निवडणुकीत सदाभाऊंनी जयंत पाटील यांनाच टार्गेट केले होते. याचा राग राष्ट्रवादीत होताच. तोच राग जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतून निघाला आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, रयत विकास आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन आघाडी केली होती. या आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी होतील असे दिसत असताना, रयत विकास आघाडीचे आणि त्यात पुन्हा सदाभाऊ खोत आणि आ. शिवाजीराव नाईक समर्थक सुरेखा जाधव यांचा पराभव झाला. आघाडीच्या सदस्यांना धर्म सोडायला लावला, याची चर्चा सुरू झाली आहे.
रयत आघाडी सर्वपक्षीय आघाडीत असल्यामुळे त्यांचे उमेदवार सुरेखा जाधव यांना आठ मतांचा कोटा दिला होता. यामध्ये जाधव स्वत:, जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सुनीता पवार (भाजप), चंद्रकांत पाटील, संजय पाटील, संजीव पाटील, आशा झिमूर (चौघे राष्टÑवादी), संभाजी कचरे (राष्टÑवादी बंडखोर) यांचा समावेश होता. परंतु जाधव यांना आठपैकी पाच मते मिळाली. उर्वरित तीन मते त्यांना मिळाली नाहीत. जाधव स्वत: आणि संग्रामसिंह देशमुख, सुनीता पवार यांची मते फुटली नाहीत, हे उघड आहे. उर्वरित पाच मते राष्ट्रवादीची होती, ती मिळाली नसल्यामुळे जयंतराव-शेट्टी गट्टी झाल्याचे बोलले जाते.
राष्ट्रवादी मतांचा कोटा ‘रयत’ला का?
जयंत पाटील आणि रयत विकास आघाडीचे नेते सदाभाऊ खोत, भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्यातील सख्य जिल्ह्याला माहीत आहे. तरीही भाजपच्या नेत्यांनी सुरेखा जाधव यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या पाच सदस्यांचा कोटा का ठेवला, या गटात रयत विकास आघाडीच्या प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी या तीन मतांचा का समावेश केला नाही? असा प्रश्न आहे.
घोरपडे गटाकडून खेळी
संयुक्त आघाडीत अजितराव घोरपडे यांच्या विकास आघाडीचे दोन सदस्य आहेत. आशा पाटील यांना आठ मतांचा कोटा देण्यात आला होता. त्यापैकी एक मत अवैध ठरविण्यात आले. त्याचा फटकाही आघाडीला बसला

Web Title: Sadabhau jhodode Shetty-Jayantrao stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.