सदाभाऊ,दुसऱ्याच्या पायरीवर का बसताय?

By admin | Published: June 23, 2016 12:21 AM2016-06-23T00:21:26+5:302016-06-23T01:16:06+5:30

अनिल बाबर : विट्यात पालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग

Sadabhau, what is the status of the second? | सदाभाऊ,दुसऱ्याच्या पायरीवर का बसताय?

सदाभाऊ,दुसऱ्याच्या पायरीवर का बसताय?

Next

विटा : मान्सूनप्रमाणेच नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. खरीप पेरण्यांसाठी कुऱ्या तयार ठेवल्या आहेत. तशाच निवडणुकीसाठीही कुऱ्या तयार ठेवा, असे आवाहन आ. अनिल बाबर यांनी केले. त्याचवेळी मुख्यमंत्री माझे काही ऐकत नाहीत, त्याची काळजी मी करतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी माझे ऐकू नये म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या पायरीवर का बसताय, असा टोलाही त्यांनी माजी आ. सदाशिवराव पाटील यांना लगावला.
विटा येथील शिवाजीनगर येथे आमदार फंडातून मंजूर करण्यात आलेल्या रस्ता कामाच्या प्रारंभप्रसंगी आ. बाबर बोलत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.
ते म्हणाले की, विकासाचा अजेंडा व नागरीकरणाच्या उपाययोजना घेऊनच नगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे आता मागील चूक न करता सर्वसामान्य नागरिकांची विटा नगरपरिषदेत सत्ता आणण्यासाठी विटेकरांनी साथ द्यावी. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची जबाबदारी मी घेतली आहे. टेंभूचे पाणी येत्या दोन महिन्यात ढवळेश्वर तलावात सोडणार आहे.
माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री माझे काही ऐकत नाहीत, त्याची काळजी मी करतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी माझे ऐकू नये म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या पायरीवर का बसताय? याचे उत्तर जनतेलाच दिले तर बरे होईल.
यावेळी माजी उपसभापती सुहास बाबर, विनोद गुळवणी, सुखदेव शितोळे, तानाजी बाबर, राजू जाधव, पंचायत समितीचे उपसभापती किसन सावंत, उत्तम चोथे, प्रवीण गायकवाड, अमर शितोळे, मकरंद गायकवाड, धनाजी बाबर, विनायक शितोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रासकर, शिवाजीराव हारूगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

विटा पालिकेत परिवर्तन अटळ
यावेळी सुहास बाबर यांनी विटा नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून पालिकेची विरोधकांकडे सत्ता आहे. ते एका शहराचा विचार करतात, पण पंचायत समितीच्या माध्यमातून माझ्याकडे ६५ गावांचे लोक येतात. कोणतीही तक्रार नाही. परंतु, नगरपरिषदेत दररोज तक्रारी आहेत. पंचायत समितीत निर्भयपणे माणूस जातो, तसा नगरपरिषदेत जात नाही. गत निवडणुकीत आमच्याकडे काहीही नसताना मिळेल त्यांना घेऊन निवडणूक लढविली. आता ही प्रगती व परिवर्तनाची लढाई आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत परिवर्तन होईलच.

Web Title: Sadabhau, what is the status of the second?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.