सदाशिव वाघमोडेंचा खोंड प्रथम
By admin | Published: January 14, 2015 10:06 PM2015-01-14T22:06:08+5:302015-01-14T23:51:19+5:30
खरसुंडी यात्रा : जनावरांचे प्रदर्शन; सात कोटींची उलाढाल
खरसुंडी : तीर्थक्षेत्र खरसुंडी (ता. आटपाडी) येथे पौषी यात्रा अपूर्व उत्साहात व भक्तिभावात पार पडली. यावेळी ग्रामपंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जातीवंत जनावरांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवापूर येथील सदाशिव वाघमोडे यांच्या खोंडाने प्रथम क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे इतर प्रकारातील पहिल्या तीन जनावरांच्या मालकांचा रोख रक्कम, ढाल आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यात्रेत सुमारे सात कोटींची उलाढाल झाल्याचे बाजार समितीच्या प्रशासक विजया बाबर यांनी सांगितले.प्रतिवर्षाप्रमाणे या यात्रेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या यात्रेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ग्रामपंचायतीने विविध सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. प्रदर्शनात विजयी झालेल्या जनावरे मालकांची नावे पुढीलप्रमाणे - एक वर्षाच्या आतील खोंड : प्रथम - सदाशिव वाघमोडे (शिवापूर), द्वितीय - हणमंत चव्हाण (आजनाळे), तृतीय - जयेश पाटील (शेटफळे).
एक वर्षापुढील खोंड : प्रथम - भाऊ कोळवले (आजनाळे), द्वितीय - शिवाप्पा अजूर (शिवनूर), तृतीय - सिदू बिराजदार (इंगळगाव).
दुसा खोंड : प्रथम - चंद्रकांत मेटकरी (मानेवाडी), द्वितीय - हणमंत चव्हाण (आजनाळे). चौसा खोंड : प्रथम - तानाजी भोसले (खरसुंडी), द्वितीय - नंदकुमार माने (खरसुंडी), तृतीय - तुकाराम चव्हाण (सिध्देवाडी). सहादाती खोंड : प्रथम - बिरा मेटकरी (सांगोला), द्वितीय - शांताराम गवळी (बलवडी), तृतीय - लक्ष्मण जाधव (जाधववाडी). जुळूक बैल : प्रथम - हणमंत चव्हाण (आजनाळे), द्वितीय - दादासाहेब शिंदे (आजनाळे), तृतीय - तानाजी भोसले (खरसुंडी).
एका वर्षाच्या आतील गाय : प्रथम - सिध्देश्वर पोमधरणे (खरसुंडी), द्वितीय - सकलेन शेख (खरसुंडी), तृतीय - कोंडाबाई गायकवाड (शेटफळे). एक वर्षाच्या पुढील गाय : प्रथम - दत्तात्रय विटेकर (सोमेवाडी), द्वितीय - सोमा झंजे (घाणंद). दुसी कालवड : प्रथम - हरी शिंदे (खरसुंडी). चौसा गाय : प्रथम - चंद्रकांत पुजारी (खरसुंडी), द्वितीय - भीमराव बाबर (डोंगरगाव), तृतीय- संकेत पुजारी (खरसुंडी).
सहादाती गाय : प्रथम - आप्पासाहेब गायकवाड (शेटफळे), द्वितीय - सौरभ पुजारी (खरसुंडी), तृतीय- बजरंग लेंगरे (लेंगरेवाडी). जुळूक गाय : प्रथम - गणेश पुजारी (खरसुंडी), द्वितीय - नाना इंगवले (खरसुंडी), तृतीय - राजाराम सागर (आटपाडी).
स्पर्धेतील खोंड विजेत्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक विजया बाबर, सरपंच सौ. रुक्मिणीताई भोसले, उपसरपंच विजय पुजारी यांच्याहस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी धोंडिराम इंगवले, राहुल गुरव, पांडुरंग भिसे, ग्रामसेवक आर. डी. मोटे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)