सिनर्जी रुग्णालयात ३० कोरोनाग्रस्त गर्भवतींची सुरक्षित प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:20+5:302021-05-21T04:27:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरजेतील सिनर्जी रुग्णालयात ३० कोरोनाग्रस्त गर्भवतींची सुरक्षित प्रसूती झाली. गर्भवतींचे व बाळांचे प्राण वाचविण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेतील सिनर्जी रुग्णालयात ३० कोरोनाग्रस्त गर्भवतींची सुरक्षित प्रसूती झाली. गर्भवतींचे व बाळांचे प्राण वाचविण्यात सिनर्जीच्या डॉक्टरांनी यश मिळविले.
रुग्णालयाचे चेअरमन, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र आरळी, कार्यकारी संचालक प्रसाद जगताप म्हणाले की, १४ एप्रिल रोजी पहिली कोरोनग्रस्त महिला दाखल झाली. कोरोनाच्या संसर्गामुळे तिची सुरक्षित प्रसूती व बाळासह प्राण वाचविणे आव्हानात्मक होते, पण डॉक्टरांनी आव्हान पेलले. यानंतर आजवर ३० महिलांची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. यातील बऱ्याच महिलांमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेची समस्या होती. कोरोनामुळे प्रकृतीही गंभीर होती.
डॉ. आरळी, डॉ. सुरेश पाटील, डॉ. आशा गाझी, डॉ. इंद्रजित भोसले व डॉ. रिनाज पटेल, बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन जंगम यांच्या टीमने सर्व गर्भवतींची सुरक्षित सुटका केली. १८ महिलांची सिझेरिअनद्वारे तर १२ महिलांची नैसर्गिक प्रसूती झाली. यापैकी दोघींना जुळे झाले.
जगताप म्हणाले की, संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी १५ बेडचा सुसज्ज बालरोग अतिदक्षता विभाग तयार करणार आहोत. सध्याची गंभीर कोविड परिस्थिती पाहता ५० ऑक्सिजन बेड वाढवले आहेत.
यावेळी डाॅ. रोहित चढ्ढा, डॉ. स्वाती सोमासे, डॉ. अदिती फळे, डॉ. गौरव फळे,डॉ. राहुल सुर्वे, डॉ. सचिन वनमोरे, डॉ. मोहसीन पठाण आदी उपस्थित होते.