सांगलीच्या रस्त्यांवर भगवा महापूर

By admin | Published: September 27, 2016 10:22 PM2016-09-27T22:22:50+5:302016-09-28T00:45:06+5:30

शहरभर लांबच लांब रांगा : भगवे ध्वज, भगव्या टोप्यांनी वातावरण भारलेले

Saffron floods on Sangli road | सांगलीच्या रस्त्यांवर भगवा महापूर

सांगलीच्या रस्त्यांवर भगवा महापूर

Next

सांगली : मराठा क्रांती मूक मोर्चासाठी जिल्ह्यातून मराठा बांधव सांगलीत चारही दिशांनी दाखल होत होते. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते गर्दीने फुललेले होते. हातात भगवे ध्वज घेतलेल्या व डोक्यावर भगवी टोपी घातलेल्या महिला व पुरूषांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. प्रमुख चौका-चौकात भव्य भगवे ध्वज डौलाने फडकत होते. संपूर्ण शहरातच भगवा महापूर आल्यासारखी स्थिती होती.
हरभट रस्ता, स्टेशन चौक, राजवाडा चौक, शंभरफुटी, विश्रामबागकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. उपनगरांतही भगवा महापूर पाहायला मिळाला. सकाळी सात वाजल्यापासूनच जिल्ह्याच्या विविध गावांतून मराठा बांधव मोर्चासाठी येत होते. विश्रामबाग चौकाच्या दिशेने जाणारे रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. लहान मुले, तरूण, तरुणी, महिला, वृद्धांसह पुरूष मोठ्या संख्येने सांगलीत दाखल झाले होते. प्रत्येकाच्या हातात भगवा ध्वज होता, डोक्यावर भगवी टोपी घातली होती. चौका-चौकात सहभागी मोर्चेकऱ्यांना भगवा टिळा लावला जात होता. डोक्याला मराठा क्रांती मोर्चाची भगवी, पांढरी पट्टी होती. विश्रामबाग ते राममंदिर या मोर्चाच्या मुख्य मार्गावर तर भगवे ध्वजच ध्वज फडकत होते. चौका-चौकात भलेमोठे भगवे ध्वज लावण्यात आले होते. विद्युत खांबांवरही ध्वज फडकत होते. संपूर्ण शहरच भगवेमय झाल्याची प्रचिती येत होती. दुचाकी, चारचाकी वाहनांवरही भगवे ध्वज लावूनच मराठा बांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते. (प्रतिनिधी)

झेडपीच्या शाळा सुरू, ‘माध्यमिक’च्या बंद
जिल्हा परिषदेच्या महापालिका क्षेत्रातील सात शाळा वगळता जिल्ह्यातील अन्य शाळा सुरू होत्या़ मात्र माध्यमिक शिक्षण विभागाकडील माध्यमिकच्या बहुतांश म्हणजे ८५ टक्के शाळांना मंगळवारी सुटी देण्यात आली होती़ सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्वच शाळांना प्रशासनाने सुटी दिली होती़
मराठा क्रांती मोर्चात शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे, म्हणून शिक्षण संस्था चालकांनी माध्यमिक शाळांना सुटी दिली होती़ त्यामुळे जिल्ह्यातील मराठा समाजातील शिक्षकही आंदोलनात सहभागी झाले होते़
महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आल्यामुळे येथील युवक मराठा मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ जिल्हा परिषदेच्या महापालिका क्षेत्रातील सात शाळांना सुटी देण्यात आली होती़ जिल्हा परिषदेच्या उर्वरित शाळा सुरळीत सुरु होत्या, असा दावा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केला आहे़ शाळा सुरु होत्या, तरी मराठा समाजाच्या शिक्षकांनी रजा काढून आंदोलनात सहभाग नोंदविला़

...आणि शहर झाले स्तब्ध !
सांगली : कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सांगली शहर दिवसभरासाठी स्तब्ध झाले. शहर परिसरात अघोषित बंद पाळण्यात आला. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. मोर्चा संपल्यानंतर सायंकाळी काही व्यावसायिकांनी दुकाने उघडली. मोर्चानंतर रस्त्यांवर गर्दी कमीच दिसून आली.
मराठा समाजाने मंगळवारी सांगलीत विराट मोर्चा काढला. या मोर्चाला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला होता. सकाळपासूनच सर्व दुकाने, आॅफिस, आस्थापना बंद होत्या. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेली कापडपेठ, मेनरोड, हरभट रोड, मारुती रस्ता, सराफ बाजारसह परिसरातील दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. मोर्चात लाखो मराठा समाजबांधव सहभागी होणार असल्याने वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला होता. शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुटी नसली तरी, अनेकजण रजा टाकून मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चाचा प्रमुख मार्ग असलेल्या विश्रामबाग चौक ते राममंदिर या रस्त्यावरील सर्व व्यवहार ठप्प होते. वसंतदादा मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली होती. त्यामुळे मार्केट यार्डात शुकशुकाट होता. पानपट्टीपासून ते मोठ्या दुकानांपर्यंत सारेच व्यवहार ठप्प झाले होते. दुपारी सव्वाएकच्या सुमारास मोर्चाचा समारोप झाल्यानंतर रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. पण अवघ्या तासाभरात शहरातील रस्त्यांवरील गर्दी ओसरली. त्यामुळे दुपारनंतर काही व्यावसायिकांनी दुकाने उघडली. नागरिकांनी स्वयंघोषित सुटी घेतल्याने बाजारपेठांत शुकशुकाट दिसून आला. (प्रतिनिधी)...आणि शहर झाले स्तब्ध !

मोर्चाचा प्रमुख मार्ग असलेल्या विश्रामबाग चौक ते राममंदिर या रस्त्यावरील सर्व व्यवहार ठप्प होते. वसंतदादा मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली होती. त्यामुळे मार्केट यार्डात शुकशुकाट होता. पानपट्टीपासून ते मोठ्या दुकानांपर्यंत सारेच व्यवहार ठप्प झाले होते. दुपारी सव्वाएकच्या सुमारास मोर्चाचा समारोप झाल्यानंतर रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. पण अवघ्या तासाभरात शहरातील रस्त्यांवरील गर्दी ओसरली. त्यामुळे दुपारनंतर काही व्यावसायिकांनी दुकाने उघडली. नागरिकांनी स्वयंघोषित सुटी घेतल्याने बाजारपेठांत शुकशुकाट दिसून आला. (प्रतिनिधी)

मराठ्यांना शिक्षण, नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे

‘अ‍ॅट्रॉसिटी’त सुधारणा करा : अकरा मागण्या

सांगली : मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळायला हवे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा व्हाव्यात, शेतीमालाला हमीभाव मिळावा, अशा आग्रही मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सुरूवातीपासूनच करण्यात येत आहेत.
कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी
कोपर्डी घटनेतील आरोपींवर अति जलद न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होईल, असे पुरावे सादर करावेत. निष्णात वकिलांमार्फत आरोपपत्र दाखल करण्यात यावे.
मराठ्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे
मराठा समाजासाठी नोकरीची दारे जवळपास बंद झाली आहेत. शिक्षण व नोकऱ्यांमध्ये ५२ टक्के आरक्षण आहे. उर्वरित ४८ टक्के जागांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त जागांवर आरक्षित जागेचे उमेदवार घेतात. त्यामुळे केवळ १५ ते २0 टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी शिल्लक राहतात. याचा युवक वर्गामध्ये प्रचंड चीड, संताप व उद्वेग आहे. आपण या देशाचे दुय्यम नागरिक आहोत, अशी त्यांची भावना तयार होत आहे. शैक्षणिक प्रवेश व नोकऱ्यांमध्ये ओबीसींप्रमाणे आरक्षण देण्यात यावे.
अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी
अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींचा गैरवापर होत आहे. त्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे.
स्वामिनाथन् आयोगाच्या
शिफारशी लागू कराव्यात
कोरडवाहू पिके घेणाऱ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी शेतीतील उत्पन्न हा चिंतेचा विषय आहे. त्यांना पुन्हा सन्मान मिळवून देण्यासाठी स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव द्यावा
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक २५ टक्के नफा, हे सूत्र धरून दरवर्षी शेतीमालाचा हमीभाव निश्चित करण्यात यावा. बाजारात यापेक्षा कमी भाव असल्यास सरकारने शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यावा. राज्य कृषी आयोग स्थापन करून वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी मोफत विमा योजना राबवावी. सर्वात प्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. पूर्णवेळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व हॉस्टेलचा खर्च शासकीय निधीतून भागवावा. ही मागणी तातडीने पूर्ण करावी. शेतीसाठी पतपुरवठा ४ टक्के सरळ व्याजदराने करावा.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास मदत
गेल्या १0-१२ वर्षांपासून राज्यात नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, तसेच मुला-मुलींना नोकऱ्या नसल्याने हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्याग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी व आत्महत्या झालेल्या कुटुंबातील वारसांना शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ फक्त मराठा समाजासाठी असावे
अ) शासनाची सर्व समाजासाठी प्रवर्गनिहाय महामंडळे आहेत. त्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळही फक्त मराठा समाजासाठी असावे. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना या महामंडळातर्फे शैक्षणिक, वसतिगृह शुल्क, भोजनासाठी १00 टक्के अनुदान देण्यात यावे.
ब) नोकरीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी येथे निवासी प्रशिक्षण केंद्र काढावे
मराठा समूहाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वायत्त संस्था निर्माण करावी
अ) मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी एक स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावी. या माध्यमातून मराठा व खुल्या प्रवर्गातील इतर समाजासाठी, युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात यावे.
ब) उच्च शिक्षणासाठी व परदेशातील शिक्षणासाठी व्याजमुक्त कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. एम. फिल्. व पीएच. डी. करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, ताराबाई शिंदे व विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने फेलोशीप मिळावी.
छत्रपती शिवरायांचे मुंबईत स्मारक उभारावे
छत्रपती शिवाजी महाराज ही या देशाची अस्मिता असून, त्यांचे भव्य स्मारक येत्या दोन वर्षात मुंबईमध्ये उभे राहील, अशाप्रकारे सरकारने कृती करावी.
ई.बी.सी. सवलतीच्या उत्पन्नाची
मर्यादा १० लाख करावी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ई. बी. सी. सवलतीसाठीची उत्पन्न मर्यादा १० लाख रूपये करावी. तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही पदवी व पदव्युत्तर शिक्षण, वैद्यकीय, इंजिनिअरिंग, व्यवस्थापन तसेच इतर व्यवसायिक शिक्षण शुल्कही इतर आरक्षित सामाजाच्या विद्यार्थ्यांना आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्क ाइतके असावे.
पदोन्नतीसाठी वयाची अट समान असावी
शासकीय नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी मराठा समाज व इतर आरक्षित समाज यांना वयाची अट समान असावी.

Web Title: Saffron floods on Sangli road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.