सरकारकडून संभाजीराव भिडेंचा विश्वासघात : शिवप्रतिष्ठानचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 09:45 PM2018-03-26T21:45:20+5:302018-03-26T21:45:20+5:30

सांगली : कोरेगाव-भीमा दंगल होऊन तीन महिने होऊन गेले तरी, सरकारने खरे सूत्रधार अजूनही समाजासमोर आणले नाहीत. गेल्या तीन-चार वर्षांत संभाजीराव भिडे वडू-बुद्रुक (जि. पुणे) येथे फिरकलेही नाहीत.

 Samajgir Bhoja's betrayal by the government: The charge of Shiv Pratishthan | सरकारकडून संभाजीराव भिडेंचा विश्वासघात : शिवप्रतिष्ठानचा आरोप

सरकारकडून संभाजीराव भिडेंचा विश्वासघात : शिवप्रतिष्ठानचा आरोप

Next
ठळक मुद्देआंबेडकरांवर कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार

सांगली : कोरेगाव-भीमा दंगल होऊन तीन महिने होऊन गेले तरी, सरकारने खरे सूत्रधार अजूनही समाजासमोर आणले नाहीत. गेल्या तीन-चार वर्षांत संभाजीराव भिडे वडू-बुद्रुक (जि. पुणे) येथे फिरकलेही नाहीत. तरीही त्यांच्याविरुद्ध दंगलीचे मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करून सरकारने भिडेंचा विश्वासघात केला आहे, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. प्रकाश आंबेडकर यांना दंगलीस जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

चौगुले म्हणाले, आंबेडकर हे थोर महान व्यक्तीचे वंशज आहेत, याचे भान त्यांनी ठेवावे. सर्वच पक्ष जातीचे राजकारण करीत आहेत; पण आम्ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नाही. २८ मार्चला आमचा मोर्चा निघेलच. दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगली भडकविण्याचा काहीजणांचा अजूनही उद्योग सुरू आहे. पुण्यात घेण्यात आलेली एल्गार परिषद ही जातीय दंगल भडकविण्यासाठीच होती. याचे संयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. भिडे यांचा दंगलीशी काहीही संबंध नाही. अगदी यमाला चौकशीसाठी नेमले तरी, सत्यच बाहेर येईल. कोरेगाव-भीमा दंगलीचा कट कोणी रचला? हे समाजासमोर आले पाहिजे. सरकार याप्रश्नी का गप्प आहे? हे समजत नाही. २८ मार्चच्या मोर्चानंतरही भिडे यांच्यावरील गुन्हे सन्मानपूर्वक मागे घेतले नाही तर, आम्ही दिल्लीत मोर्चा काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागणार आहोत. भिडे दोषी आहेत का नाहीत? याचे निवेदन करण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे.

चौगुले म्हणाले, २८ मार्चला राज्यभर, जिल्हास्तरावर मोर्चे काढले जाणार आहेत. बेळगाव, विजापूर, गोवा येथेही मोर्चे निघतील. अन्य राज्यात केवळ निवेदन दिले जाणार आहे. मोर्चाचे मुख्य केंद्र सांगली आहे. कर्मवीर चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चास प्रारंभ होईल. राम मंदिर, काँग्रेस भवन, आझाद चौक या मार्गावरून हा मोर्चा स्टेशन चौकात जाऊन त्याचे सभेत रूपांतर होईल. सातजणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यास जाणार आहे. कोणाचीही भाषणे होणार नाहीत. केवळ निवेदन दिले जाणार आहे. एक लाख कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होतील. मोर्चातील सहभागी लोकांना १८ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. रुग्णवाहिकाही ठेवल्या आहेत. आंबेडकर स्टेडियम, नेमिनाथनगर व शंभर फुटी रस्त्यावर पार्किंगची सोय केली आहे.

आम्ही उघडे पाडू
चौगुले म्हणाले, संभाजीराव भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. पुण्यातील एल्गार परिषदेत भाषणे करणाºया वक्त्यांवर गुन्हे दाखल करावेत. २ जानेवारील पुकारण्यात आलेल्या बंद काळात तोडफोडीत जे नुकसान झाले ते संबंधितांकडून वसूल करावे, या मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे. जातीय विष पसरवरलं जात आहे. भिडेंना जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. जाती-जातीमध्ये विष पेरणाºयांना आम्ही उघडे पाडू.

सांगलीतील तपास थांबला

सांगलीत ३ जानेवारीला बंद पुकारुन त्यास हिंसक वळण लावण्यात आले. तोडफोड करुन खासगी व शासकीय मालमत्तेचं लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आले. तोडफोड करणाºया व्हिडीओ चित्रीकरणात कैदही झाले. अज्ञांताविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र पोलिसांनी केवळ सात संशयितांची नावे निष्पन्न केली. यातील केवळ तिघांना अटक केली. पुढे तपास झालाच नाही. तपास जाणीवपूर्वक थांबवून संशयितांना पोलिसांनी एकप्रकारे अभय दिला असल्याचे चित्र आहे.
 

Web Title:  Samajgir Bhoja's betrayal by the government: The charge of Shiv Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.