शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी सांगलीत हमालांचाही संप

By admin | Published: June 2, 2017 11:31 PM2017-06-02T23:31:25+5:302017-06-02T23:31:25+5:30

शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी सांगलीत हमालांचाही संप

The Sammelat Hamamalas are also involved in supporting the farmers | शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी सांगलीत हमालांचाही संप

शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी सांगलीत हमालांचाही संप

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शेतकऱ्यांनी त्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नासाठी सुरु केलेल्या संपाला सांगली जिल्हा हमाल पंचायतीने शुक्रवारी पाठिंबा दिला. मार्केट यार्डमधील हमाल व तोलाईदार यांनी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत काम बंद ठेवून निदर्शने केली.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, शेतकरी, शेतमजूर व इतर अंगमेहनती कष्टकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन सुरु करावी, शेतकऱ्यांच्या उत्पादित मालास उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, या प्रमुख मागण्या हमाल पंचायतीने केल्या. यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, कृषी राज्यमंत्री यांना पाठविले जाणार आहे. बापूसाहेब मगदूम, अ‍ॅड. के. डी. शिंदे, बाळासाहेब बंडगर, विकास मगदूम यांनी नेतृत्व केले.
संपूर्ण कर्जमुक्ती द्या
सर्व हमालांना सकाळी नऊ वाजता एकत्रित करण्यात आले. त्यांना शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी काम बंदचे आवाहन केले. त्यानुसार सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत यार्डातील सर्व हमाल व तोलाईदारांनी काम बंद आंदोलन केले. बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा घेण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिलीच पाहिजे, अशा घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.

Web Title: The Sammelat Hamamalas are also involved in supporting the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.