वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:01+5:302021-01-03T04:27:01+5:30

गावे : ताकारी, दुधोंडी, तुपारी, कारंदवाडी, बहे, नरसिंहपूर, कारंदवाडी, सांगलवाडी, हरिपूर, अंकली, निलजी-बामणी, ढवळी, म्हैसाळ, शिरढोण, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, ...

Sand extraction | वाळू उपसा

वाळू उपसा

Next

गावे : ताकारी, दुधोंडी, तुपारी, कारंदवाडी, बहे, नरसिंहपूर, कारंदवाडी, सांगलवाडी, हरिपूर, अंकली, निलजी-बामणी, ढवळी, म्हैसाळ, शिरढोण, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, हिंगणगाव, लोणारवाडी-पांडेगाव, भाळवणी, रामापूर, बलवडी, आंधळी, राजापूर, बोरगाव, मोरगाव, निमणी, सावळज, गव्हाण.

या सर्व नद्या-ओढ्यांत वाळूसाठे शिल्लक आहेत. सध्या वाळूचा एकही शासकीय ठेका दिलेला नाही. गेल्या पाच वर्षांत फक्त २०२६-१७ मध्ये वाळूचे ठेके दिले गेले. त्यातून शासनाला २४ कोटी ९५ लाखांचा महसूल मिळाला. त्यानंतर आजतागायत वाळू ठेके बंद आहेत. हरित न्यायालयाच्या मनाईमुळे वाळू लिलावाची प्रक्रिया अद्याप बंद आहे. बोटीने उपशावर हरित न्यायालयाचे निर्बंध आहेत.

नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळूचा वापर सर्वत्र सुरू आहे. शासकीय बांधकामांसाठी कृत्रिम वाळूचाच पर्याय शासनानेही स्वीकारला आहे. फाऊन्ड्रीमध्ये कास्टिंग काढल्यानंतर एरवी फेकून दिली जाणारी वाळूदेखील आता बांधकामांसाठी टनावर विकली जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणतात, जिल्ह्यात काही औट्यांचे ठेके देण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी १३ प्रस्ताव दाखल झाले आहेत. हरित न्यायालयाच्या अटी व शर्तींचे पालन करून ठेके देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नैसर्गिक वाळूवर पर्याय म्हणून कृत्रिम वाळूचा पर्याय बांधकाम व्यावसायिकांनीही स्वीकारला आहे. मागणीनुसार त्यामध्ये अनेकविध व्हरायटी आल्या आहेत. वॉश्ड सॅण्ड, प्लास्टर सॅण्ड, फाऊन्ड्री सॅण्ड, रेडीमिक्स प्लास्टर, एम सॅण्ड असे प्रकार निघाले आहेत. अंतर्गत गिलाव्यासाठी रेडीमिक्स प्लास्टरचा वापर होतो. फक्त पाणी मिसळले की गिलाव्याचे मिश्रण तयार होते. गिलाव्यासाठी समुद्री वाळूच्या नावाखाली गुलाबी वाळूचाही वापर केला जातो.

कोट

क्रश सॅण्ड तथा कृत्रिम वाळू उत्पादकांनी नैसर्गिक वाळूच्या तोडीस तोड वाळू उत्पादनात बऱ्यापैकी यश मिळविले आहे. मागणीनुसार गिलावा, स्लॅब, पायाभरणीसाठी वेगवेगळी वाळू मिळते. नैसर्गिक वाळूच्या दर्जाचेच बांधकाम कृत्रिम वाळूतून होते, असा विश्वास आम्ही ग्राहकांत निर्माण केला आहे.

- विकास लागू, बांधकाम व्यावसायिक

कोट

नैसर्गिक वाळू मिळविण्यासाठी अनेक कटकटींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे कृत्रिम वाळूचा पर्याय बांधकाम व्यावसायिकांनी स्वीकारला आहे. सिमेंट कंपन्यांनी गिलाव्यासाठी प्लास्टर स्वरुपातील मिश्रण तयार केले आहे. पाण्यात मिसळले की गिलाव्यासाठी थेट वापरता येते. वाळूची गरज राहत नाही. कोनिकल, ग्राईंडेड, वॉश्ड, राऊण्ड अशा विविध प्रकारची कृत्रिम वाळू मिळते. तिचा वापर पायाभरणी, स्लॅब, बांधकामासाठी करतो.

- प्रमोद परीख, बांधकाम व्यावसायिक

-------

Web Title: Sand extraction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.