संदीप मोहिते याच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:50 AM2019-09-12T00:50:10+5:302019-09-12T00:50:13+5:30

इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्यातील महारयत कंपनीचा संचालक संदीप मोहिते याच्या पोलीस कोठडीत येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे ...

Sandeep Mohit's cell increases | संदीप मोहिते याच्या कोठडीत वाढ

संदीप मोहिते याच्या कोठडीत वाढ

Next

इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्यातील महारयत कंपनीचा संचालक संदीप मोहिते याच्या पोलीस कोठडीत येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी आणखी चार दिवसांची वाढ केली. सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोहिते याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. त्याच्याकडील दोन महागड्या मोटारी पथकाने जप्त केल्या.
महारयत कंपनीकडून कडकनाथच्या घोटाळ्यात राज्यासह परराज्यातील हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातूनच रयत अ‍ॅग्रो आणि महारयत अ‍ॅग्रो या दोन कंपन्यांच्या माध्यमातून हा गंडा घालणाºया सुधीर मोहिते, संदीप मोहिते आणि इतर चौघांविरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा नोंद झाला.
या फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी संदीप मोहिते याला त्वरित अटक केली. तेव्हापासून तो गेले ११ दिवस पोलीस कोठडीत आहे. त्याचा दुसरा साथीदार हणमंत जगदाळे हासुद्धा पोलिसांच्या कोठडीत आहे. संदीप मोहिते याच्या कोठडीची मुदत बुधवारी संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले होते.
या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आणि संदीप मोहिते त्यातील मुख्य संचालक असल्याने त्याच्याकडे कसून तपास करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सरकारी वकील रणजित पाटील यांनी केली. त्यावर न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत मोहिते याच्या कोठडीत वाढ केली. दरम्यान, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संदीप मोहितेकडून दोन महागड्या मोटारी जप्त केल्या
आहेत.

Web Title: Sandeep Mohit's cell increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.