शिवसामर्थ्य सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप शिंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:29 AM2021-09-23T04:29:28+5:302021-09-23T04:29:28+5:30
कवठेमहांकाळ : शिवसेनाप्रणीत शिवसामर्थ्य सेनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी कवठेमहांकाळ येथील संदीप शिंत्रे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शिवसेनेचे ज्येष्ठ ...
कवठेमहांकाळ : शिवसेनाप्रणीत शिवसामर्थ्य सेनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी कवठेमहांकाळ येथील संदीप शिंत्रे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख दिवाकर रावते, पश्चिम महाराष्ट्र समनव्यक दगडू सपकाळ, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानूगडे-पाटील यांच्या हस्ते शिंत्रे यांना देण्यात आले.
मुंबई येथील शिवसेना भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. निवडीनंतर दिवाकर रावते, दगडू सपकाळ, प्रा. नितीन बानूगडे-पाटील यांच्या हस्ते संदीप शिंत्रे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिंत्रे म्हणाले की, जिल्ह्यात शिवसामर्थ्य सेना तळागाळापर्यंत जोमाने काम करेल. जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंना न्याय देण्यात येईल.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभूते, राज्याध्यक्ष संदीप भोज, अवी राऊत, जितेंद्र सकपाळ, अमित देशमुख, अमोल ओलेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.