कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद, शिवप्रतिष्ठानच्या मोर्चामुळे सांगलीत तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 04:06 AM2018-01-05T04:06:36+5:302018-01-05T04:07:36+5:30

शिवप्रतिष्ठानने काढलेल्या मोर्चामुळे गुरुवारी सलग दुसºया दिवशीही सांगतील तणावग्रस्त परिस्थिती होती. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यावर दाखल झालेला गुन्हा काढून टाकावा, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

Sangheit tension due to the event of the Komagata Bhauma incident, Shiva Pratishthan rallies | कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद, शिवप्रतिष्ठानच्या मोर्चामुळे सांगलीत तणाव

कोरेगाव भीमा घटनेचे पडसाद, शिवप्रतिष्ठानच्या मोर्चामुळे सांगलीत तणाव

googlenewsNext

सांगली  - शिवप्रतिष्ठानने काढलेल्या मोर्चामुळे गुरुवारी सलग दुसºया दिवशीही सांगतील तणावग्रस्त परिस्थिती होती. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यावर दाखल झालेला गुन्हा काढून टाकावा, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
‘बंद’च्या नावाखाली सांगलीत तोडफोड करणाºयांना पकडा, अन्यथा आम्हीही सांगली बंद करू, असा इशाराही देण्यात आला.
बुधवारी ‘महाराष्ट्र बंद’वेळी येथील मारुती चौकात भिडे यांचे पोस्टर फाडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानने गुरुवारी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मारुती चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मारुती रस्ता, हरभट रस्ता, शहर पोलिस ठाणे, राजवाडा चौक या मार्गावरुन घोषणाबाजी करीत हा मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहैल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे हेही दाखल झाले. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा काढून टाकावा. बंदच्या नावाखाली हुल्लडबाजी करणा-यांना अटक करावी. या सर्वांमागे भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, कबीर कला मंच, बामसेफ यांच्यासह इतर सहभागी संघटनांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिवप्रतिष्ठानचा मोर्चा पाहून मार्गावरील दुकाने पटापट बंद होऊ लागली, पण कार्यकर्त्यांनी दुकाने उघडण्यास सांगितले. तरीही काही व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली होती.

नगरमध्ये आज दलित संघटनांचा मोर्चा
 
अहमदनगर : कोरेगाव-भीमा घटनेतील दोषींविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी फुले, शाहू, आंबेडकर, परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने शुक्रवारी (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे़ मोर्चात शहरासह जिल्ह्यातून भीमसैनिक उपस्थित राहतील ,अशी माहिती सुनील क्षेत्रे व अजय साळवे यांनी गुरुवारी येथे दिली़
नगर-पुणे रोडवरील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभा घेऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले जाणार असल्याचे साळवे म्हणाले़

प्रकाश आंबेडकरांचा निषेध

शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सकाळी दहापासून मारुती चौकात जमा झाले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. मारुती चौक व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांचा निषेध करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.

एकबोटे, भिडेंविरोधात औरंगाबादेत गुन्हा

औरंगाबाद : कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी औरंगाबादेतून गेलेल्या पथकावर हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात मिलिंद एकबोटे, मनोहर ऊर्फ संभाजी भिडे, अनिल दवे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात दंगल करणे, मारहाण करणे, कारचे नुकसान करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे ग्रामीणमधील शिक्रापूर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केल्याची माहिती सूत्रांनी दिली. छावणी पोलिसांनी सांगितले की, भावसिंगपुरा परिसरातील पेठेनगर येथील रहिवासी जयश्री सुदाम इंगळे या अन्य काही सहकाºयांसह १ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेल्या होत्या.

राहुल फटांगडेच्या कुटुंबाला २५ लाख द्या

औरंगाबाद : कोरेगाव भीमा येथील दंगलीत मरण पावलेल्या राहुल फटांगडे या तरुणाच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने २५ लाख रुपये मदत आणि घरातील एक जणाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणाले की, भीमा- कोरेगाव घटनेचा मराठा क्र ांती मोर्चाने जाहीर निषेध नोंदविला आहे. या घटनेला भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे जबाबदार असल्याचे समोर आल्यानंतरही पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नाही. असे असताना मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावतीचे भाजप आमदार अनिल बोंडे यांनी या घटनेमागे मराठा क्रांती मोर्चा असल्याचे बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चा निषेध करीत असून, दोन समाजात तेढ निर्माण करणाºया आमदार बोंडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी मोर्चा करीत आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही ५८ मोर्चे काढले. आमचे मोर्चे कोणत्याही समाजाविरोधात नव्हते, हे मागासवर्गीय समाजाला माहीत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दलित वसाहतीमध्ये जाऊन बैठका घेत आहेत.

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेवेळी भिडे गुरुजी तिथे गेलेही नव्हते. प्रकाश आंबेडकरांनी जाणीवपूर्वक त्यांचे नाव घेतले. गुरुजी सांगलीतच होते. त्यांच्याविरुद्ध महिलेने दिलेली फिर्याद खोटी असून गुन्हा काढून टाकावा.
- नितीन चौगुले, कार्यवाह, शिवप्रतिष्ठान

Web Title: Sangheit tension due to the event of the Komagata Bhauma incident, Shiva Pratishthan rallies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.