सांगली :  वारणा धरणात 15.20 टी.एम.सी पाणीसाठा, सरासरी 1.1 मि.मी. इतका पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:18 PM2018-06-28T15:18:25+5:302018-06-28T15:20:40+5:30

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 15.20 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 1.1 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.

Sangli: 15.20 TMC water stock in Varanha Dam, average of 1.1 mm. So much rain | सांगली :  वारणा धरणात 15.20 टी.एम.सी पाणीसाठा, सरासरी 1.1 मि.मी. इतका पाऊस

सांगली :  वारणा धरणात 15.20 टी.एम.सी पाणीसाठा, सरासरी 1.1 मि.मी. इतका पाऊस

Next
ठळक मुद्देवारणा धरणात 15.20 टी.एम.सी पाणीसाठासरासरी 1.1 मि.मी. इतका पाऊस

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 15.20 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 1.1 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.

आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 28.53 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 3.63 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 2.16 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 7.80 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 2.54 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी. आहे. अलमट्टी धरणात 24.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. आहे.

 तालुकानिहाय आकडेवारी 

मिरज 1.8, खानापूर-विटा 2.4, तासगाव 0.8, शिराळा 3.7, कवठेमहांकाळ 1.0, पलूस 0.5 आणि कडेगाव तालुक्यात 0.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
 

Web Title: Sangli: 15.20 TMC water stock in Varanha Dam, average of 1.1 mm. So much rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.