Sangli: निवडणुकीचा खर्च न देणारे १६६८ उमेदवार होणार अपात्र, जिल्हाधिकारी दोन दिवसांत निर्णय घेणार
By अशोक डोंबाळे | Published: March 10, 2023 09:19 PM2023-03-10T21:19:13+5:302023-03-10T21:19:35+5:30
Sangli: डिसेंबर २०२२ महिन्यात जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींमध्ये १० हजार १७० उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. यापैकी आठ हजार ५०२ उमेदवारांनी खर्च सादर केला आहे.
- अशोक डोंबाळे
सांगली : डिसेंबर २०२२ महिन्यात जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींमध्ये १० हजार १७० उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. यापैकी आठ हजार ५०२ उमेदवारांनी खर्च सादर केला आहे. पण, एक हजार ६६८ उमेदवारांनी मुदतीमध्ये खर्चाचा हिशेब सादर केला नाही. या उमेदवारांवर दोन दिवसांत अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होणार आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (ब) (१) अन्वये ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशेब मुदतीत सादर न केल्याने उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या जिल्ह्यातील एकूण एक हजार ६६८ उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब दि. २० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशेब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब तातडीने सादर करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च न देणाऱ्यांचे पद धोक्यात
तालुका एकूण उमेदवार खर्च दिलेले खर्च न देणारे
मिरज १०५९ ९७२ ८७
जत २००१ १३२१ ६८०
क.महांकाळ ७३५ ६१८ ११७
आटपाडी ५७० ५३८ ३२
खानापूर ७६४ ७५४ १०
तासगाव ५६७ ५३७ ३०
वाळवा २०७५ १७०३ ३७२
शिराळा १०६६ ८३७ २२९
कडेगाव ९०९ ८३२ ७७
पलूस ४२४ ३९० ३४