सांगली, मिरजेत ८६ सीसीटीव्ही कॅमेरे! सुहेल शर्मा , १ मे रोजी कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:18 PM2018-04-19T23:18:40+5:302018-04-19T23:18:40+5:30
सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस दलाने या तीनही शहरात अत्याधुनिक ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस दलाने या तीनही शहरात अत्याधुनिक ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. १ मेपासून हे कॅमेरे कार्यान्वित केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिली. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणा आणखी सक्षम केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शर्मा म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांच्याही अडचणी असतात. त्या अडचणी त्यांनी मांडाव्यात, यासाठी ‘समाधान हेल्पलाईन’ ही सेवा सुरु केली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खबºयांचे नेटवर्क अधिक बळकट केले जात आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल बसविले आहेत. आता विजयनगर व राजवाडा चौक येथेही सिग्नल बसविला जाणार आहे. लहान मुलांना वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी आतापर्यंत शंभर पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शहरात नव्याने चार ते पाच पोलीस चौक्या उघडल्या जाणार आहेत. सध्या शंभरफुटी रस्त्यावर चौकी सुरु केली आहे. अपघात कुठेही झाला तर जखमींना मदत करणे प्रत्येकाचे काम आहे. नागरिकांनी जखमींना मदत करावी, त्यांना पोलिसांकडून कोणताही त्रास दिला जाणार नाही.
शर्मा म्हणाले, पोलिसांची वाहने कुठे आहेत, याची तपासणी करण्यासाठी १ मेपासून वाहनांना जीपीएस ही यंत्रणा बसविली जाणार आहे. पोलीस ठाण्यांची वाहने कुठे आहेत? ती काय करीत आहेत? याची सहजपणे माहिती मिळेल. तसेच एखादी घटना घडली आहे आणि त्याच भागात दुसºया पोलीस ठाण्याचे वाहन कामानिमित्त गेले असेल, तर त्यांना कॉल करुन घटनास्थळी पाठविता येणार आहे.
पासपोर्ट काढताना पडताळणीसाठी लोकांना पोलीस ठाण्यात जावे लागत होते. लोकांचा हा त्रास कमी करण्यासाठी आता पोलीसच संबंधित लोकांच्या घरी जाऊन पडताळणीचे काम करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात हा प्रयोग सुरु केला आहे.
वाढदिनी सुटी
शर्मा म्हणाले, पोलिसांना अनेकदा २४ तास ड्युटी करावी लागते. साप्ताहिक सुटी व रजांना मुकावे लागते. सण, उत्सव तसेच स्वत:चा वाढदिवस व लग्नाचा वाढदिवसही त्यांना साजरा करता येत नाही. त्यामुळे आता वाढदिनी व लग्नाच्या वाढदिवसाला पोलिसांना सुटी जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.