Sangli: वीस टक्के व्याजाने सावकारी करणाऱ्या महिलेविरोधात सांगलीत गुन्हा

By संतोष भिसे | Published: January 12, 2024 04:51 PM2024-01-12T16:51:14+5:302024-01-12T16:51:29+5:30

Sangli News: कर्जाची मुद्दलासह परतफेड करूनही आणखी एक लाख रुपयांसाठी रिक्षा चालकाला शिवीगाळ करणाऱ्या खासगी सावकार महिलेविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Sangli: A crime was committed in Sangli against a woman who gave a loan at 20 percent interest | Sangli: वीस टक्के व्याजाने सावकारी करणाऱ्या महिलेविरोधात सांगलीत गुन्हा

Sangli: वीस टक्के व्याजाने सावकारी करणाऱ्या महिलेविरोधात सांगलीत गुन्हा

- संतोष ‌‌भिसे
सांगली - कर्जाची मुद्दलासह परतफेड करूनही आणखी एक लाख रुपयांसाठी रिक्षा चालकाला शिवीगाळ करणाऱ्या खासगी सावकार महिलेविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. अलका दत्तात्रय शिकलगार (रा. कोल्हापूर रस्ता, सांगली) असे तिचे नाव आहे. या प्रकरणी दिगंबर प्रभाकर कांबळे (वय ४३, रा. खणभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले की, कांबळे यांचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. २०१८ मध्ये वडापावच्या व्यवसायासाठी त्यांना पैशांची गरज होती. यासाठी त्यांनी अलका शिकलगार यांच्याकडे ८५ हजार रुपयांची गरज असल्याचे सांगितले. शिकलगार यांनी आठवड्याला २० टक्के व्याजाने पैसे देण्याची तयारी दर्शविली. पण ही रक्कम बिनव्याजी घेतल्याचे करारपत्र करून घेतले. १२ सप्टेंबर २०१८ रोजी ८५ हजार रुपये दिले. या पैशांच्या परतफेडीपोटी कांबळे यांनी शिकलगार यांना वेळोवेळी ८५ हजार रुपये दिले. परतफेड झाली, तरी शिकलगार यांनी आणखी १ लाख ६० हजार रुपयांची मागणी केली. कांबळे परतफेड झाल्याचे सांगितले असता, २० टक्के व्याज आकारणीचा हिशेब सांगितला. ८५ हजार रुपयांचे कर्ज आठवड्याला २० टक्के व्याजदराने दिले आहे, आजअखेर १ लाख ६० हजार रुपये देणे लागते असे सांगितले.

धनादेशाद्वारे पैसे दिले
 ऑगस्ट २०२३ रोजी कांबळे यांनी धनादेशाद्वारे आणखी २० हजार रुपये शिकलगार यांना धनादेशाद्वारे दिले. त्यावेळी शिकलगार यांनी आणखी १ लाख पाच हजार रुपये देणे लागतो असे करारपत्र करून घेतले. व्याजासह मुद्दल परत करूनही अधिकच्या पैशांसाठी कांबळे यांना शिवीगाळ आणि धमकावण्याचा प्रकार सुरु केला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर कांबळे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून महिला सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिली.

Web Title: Sangli: A crime was committed in Sangli against a woman who gave a loan at 20 percent interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.