सांगली पुन्हा पुराच्या छायेखाली, कर्नाळ रोड पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:28 PM2020-10-16T12:28:39+5:302020-10-16T12:30:54+5:30
rain, sanglinews, krushnariver मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून गुरुवारी सायंकाळीपर्यंत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ३५ फुटापर्यंत गेली होती. त्यामुळे कर्नाळ रोड पाण्याखाली गेला असून जामवाडीतील सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमध्ये पाणी शिरले होते. महापालिकेने नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. त्यामुळे सांगली शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.
सांगली : मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून गुरुवारी सायंकाळीपर्यंत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ३५ फुटापर्यंत गेली होती. त्यामुळे कर्नाळ रोड पाण्याखाली गेला असून जामवाडीतील सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमध्ये पाणी शिरले होते. महापालिकेने नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. त्यामुळे सांगली शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे.
मुसळधार पावसामुळे कोयना व वारणा धरणातून पाण्याची विसर्ग सुरू केला आहे. गुरूवारी पहाटे ३४ हजार २११ क्युसेक्स विसर्ग सुरू होता. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळी ३५ फुटापर्यंत गेली आहे. नदीचे पाणी सुर्यवंशी प्लॉट परिसरात शिरले आहे. कर्नाळ रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
अमरधाम स्मशानभूमीतही पुराचे पाणी शिरले होते. मुसळधार पाऊस व धरणातून सुरू मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. पाणी पातळी ३८ ते ४० फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगलीला पुराचा धोका निर्माण झाला आहे.
६४१ लोकांचे स्थलांतर
पुरग्रस्त भागासह मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. सायंकाळपर्यंत १२८ कुटूंबातील ६४१ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. त्यापैकी २४१ नागरिकांची महापालिकेने तात्पुरत्या निवारा केंद्रात व्यवस्था केली आहे.