Sangli: अयोध्येतून अक्षता कलक्ष कडेगांवात दर्शनासाठी दाखल
By हणमंत पाटील | Published: December 13, 2023 01:14 PM2023-12-13T13:14:21+5:302023-12-13T13:15:01+5:30
Sangli News: अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या सानिध्यात मंत्रोच्चारण केलेला कलश कराड येथून १० डिसेंबर रोजी सांयकाळी सात वाजता कडेगावातील श्रीराम मंदिरात आणण्यात आला. यावेळी कडेगाव तालुक्यातील भाविक भक्त उपस्थित होते.
- हणमंत पाटील
कडेगाव - अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण होत आहे. या भव्य श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निमित्त अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या सानिध्यात मंत्रोच्चारण केलेला कलश कराड येथून १० डिसेंबर रोजी सांयकाळी सात वाजता कडेगावातील श्रीराम मंदिरात आणण्यात आला. यावेळी कडेगाव तालुक्यातील भाविक भक्त उपस्थित होते.
अयोध्या येथून आणलेले हे तीन कलेश १३ डिसेबर रोजी सकाळी १० वाजता श्रीराम मंदिरातून कडेगाव तालुक्यातील प्रत्येक विभागात दर्शनासाठी फिरवले जाणार आहेत. यासाठी समस्त हिंदू समाजाला आमंत्रण देणार्या थेट अयोध्या येथून आलेल्या अभिमंत्रित अक्षता, श्रीरामांचा फोटो व निमंत्रण पत्रिका प्रत्येकांच्या घरात निमंत्रण देण्यासाठी अभियान तयारी तालुक्यातील युवकांनी केले आहे.
प्रत्येक गावाच्या ठिकाणी कलशाचे स्वागत, दर्शनासाठी व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम नियोजन यासाठी बैठकीसाठी बुधवारी कडेगाव येथील "श्रीराम मंदिरा" मध्ये सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व प्रभु श्रीरामांचे व कलशाचे शुभ आशीर्वाद घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.