सांगली-अंकली रस्ता राष्ट्रीय महामार्गात येणार : त्रासलेल्या नागरिक, प्रवाशांसाठी दिलासादायक पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 11:15 PM2018-09-08T23:15:04+5:302018-09-09T00:25:08+5:30

अनेकांच्या जिवाशी खेळ करीत मृत्यूचा सापळा बनलेल्या सांगली-अंकली या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये करण्याबाबत आशादायी पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे.

 The Sangli-Ankali road will be on the national highway: distressed citizens, relief measures for the passengers | सांगली-अंकली रस्ता राष्ट्रीय महामार्गात येणार : त्रासलेल्या नागरिक, प्रवाशांसाठी दिलासादायक पाऊल

सांगली-अंकली रस्ता राष्ट्रीय महामार्गात येणार : त्रासलेल्या नागरिक, प्रवाशांसाठी दिलासादायक पाऊल

Next
ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव , पंधरवड्यात निर्णय शक्य--लोकमत इफेक्ट‘लोकमत’ने या रस्त्याच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकला होता.

सांगली : अनेकांच्या जिवाशी खेळ करीत मृत्यूचा सापळा बनलेल्या सांगली-अंकली या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये करण्याबाबत आशादायी पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी भारतीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांकडे सादर केला आहे.

‘लोकमत’ने या रस्त्याच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकला होता. या रस्त्याने गेल्या काही वर्षात अनेकांचे बळी घेतले. दक्षिण बाजूच्या अनेक मोठ्या शहरांना व महामार्गांना सांगली शहराशी जोडणारा हा रस्ता खराब रस्त्यांच्या यादीत स्पर्धक बनला आहे. रत्नागिरी-नागपूर राष्टÑीय महामार्गात शिरोली ते अंकली या रस्ता समाविष्ट झाला आहे. अंकली ते सांगली हा छोटासा पट्टाच आता बाजूला झाल्यामुळे त्याला कोणीही वाली राहिलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने कधीही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने पाहिले नाही. अपघातांमागून अपघात घडत असताना, लोकांचे बळी जात असतानाही त्याची दखल घेतली गेली नाही. लोकांच्या जिवाशी खेळ खेळत मरणयातनांचा अनुभव देत गेली कित्येक वर्षे या रस्त्याने प्रवाशांना छळले. आजही हा छळ सुरूच आहे. गेल्या दहा वर्षांत शेकडो बळी या रस्त्याने घेतले. आजही अपघातांची मालिका सुरूच आहे.

याच प्रश्नावर ‘लोकमत’ने आवाज उठविला. नागरिक जागृती मंचनेही या रस्त्याच्या प्रश्नासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करतानाच रस्त्यावरील आंदोलनही उभारले. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी वृत्ताची दखल घेत अखेर सांगली-अंकली या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा समावेश राष्ट्रीय  महामार्ग क्र. १६६ मध्ये करावा, असा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये त्यांनी हा रस्ता किती धोकादायक बनला आहे, याचाही उल्लेख केला आहे. सार्वजनिक वाहतूक, नागरी वाहतुकीचे कार्य जीव मुठीत घेऊन सुरू असल्याचे सांगून जिल्हाधिकाºयांनी या रस्त्याचा समावेश राष्ट्रीयमहामार्गात होणे का गरजेचे आहे, याचेही दाखले दिले आहेत. शुक्रवारी ७ सप्टेंबर रोजी हा प्रस्ताव राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोलापूर विभागाचे प्रकल्प संचालक यांना पाठविण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर त्याच्या पाठपुराव्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने आशादायी पाऊल उचलण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींकडूनही यासाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. या रस्त्यावर जात असलेले बळी रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या या प्रयत्नांवर नागरिक जागृती मंचनेही लक्ष ठेवले आहे.

रस्त्याच्या निविदेचा : खडतर प्रवास...
सांगली-शिरोली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले होते. एकूण काम १४५ कोटी रुपयांचे होते. त्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली होती. स्वीकृत किंमत १९६ कोटी रुपये आणि टोलची मुदत २२ वर्षे ९ महिने दिली होती. कंपनीने यातील ८५ टक्के काम पूर्ण केले होते; मात्र अचानक काम रद्द करून हा मार्ग राष्टÑीय महामार्गाला जोडला गेला. याविरोधात ही कंपनी सध्या लवादाकडे दाद मागत आहे. त्यामुळे देखभाल-दुरुस्ती व उर्वरित कामांची जबाबदारी अधांतरी आहे. त्यातच या रस्त्याचे काम सुरू असताना अंकली ते कोल्हापूर या मार्गातील भूसंपादनाचे अडथळे दूर झाले होते. केवळ अंकली ते सांगली या मार्गावरील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तेथे अडथळे आले, मात्र ते सोडविण्याचा प्रयत्न फारसा झाला नाही. त्यातच शिरोली ते अंकली व तिथून मिरज असा मार्ग आता राष्टÑीय महामार्गात गेला आहे. केवळ अंकली ते सांगली हा चार किलोमीटरचा पट्टा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेला आहे. त्यामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. हा रस्ता खड्ड्यांनी भरला आहे.

Web Title:  The Sangli-Ankali road will be on the national highway: distressed citizens, relief measures for the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.