सांगली : आमिष मॅनेजरचे; नोकरी वेटरची, धीरज पाटीलचा प्रताप : दहा दिवसांची पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:18 PM2017-12-19T13:18:41+5:302017-12-19T13:28:17+5:30

मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास सोमवारी न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बेरोजेगार मुलांना तो मलेशियातील हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी लावण्याचे आमिष दाखवायचा; पण प्रत्यक्षात तो वेटरची नोकरी लावत असे, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

Sangli: Bait Manager; Job waiter, Dheeraj Patil's Pratap: Ten days police custody | सांगली : आमिष मॅनेजरचे; नोकरी वेटरची, धीरज पाटीलचा प्रताप : दहा दिवसांची पोलिस कोठडी

सांगली : मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या धीरज बाळासाहेब पाटील यास सोमवारी सांगली न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

googlenewsNext
ठळक मुद्देमलेशियातील हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी लावण्याचे आमिषचौघांकडून घेतले पाच ते सहा लाख रुपये बँक खाती सील केल्यानंतर धीरज पाटील याच्या मालमत्तेचा शोध

सांगली : मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास सोमवारी सांगली न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बेरोजेगार मुलांना तो मलेशियातील हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी लावण्याचे आमिष दाखवायचा; पण प्रत्यक्षात तो वेटरची नोकरी लावत असे, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.


संशयित कौस्तुभ पवार व त्याचा मित्र धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर), मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर), दीपक माने (मानेवाडी, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले.

मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली होती. चारही तरुणांना न्यायालयाने तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सध्या हे तरुण शिक्षा भोगत आहेत.


व्हिसा फसवणूक प्रकरणाचा मास्टरमार्इंड धीरज पाटील हाच असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली होती. काही महिन्यांपूर्वी धीरज पाटील हा स्वत: मलेशियात नोकरीसाठी गेला होता. तिथे स्वत: त्याने वेटरची नोकरी केली.

यातून त्याची परदेशी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या काही व्यक्तींशी ओळख झाली. भारतात परतल्यानंतर त्याने थेट मलेशियामध्ये रोजगार देण्याचा व्यवसायच सुरू केला. कौस्तुभ पवार हा त्याच्याकडे बेरोजगार तरुण घेऊन जात असे.

मालमत्तेचा शोध

दरम्यान, धीरज पाटील याची बँक खाती सील केल्यानंतर त्याच्या मालमत्तेचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

 

Web Title: Sangli: Bait Manager; Job waiter, Dheeraj Patil's Pratap: Ten days police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.