Sangli Bank Results : जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचाच डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 12:05 PM2021-11-23T12:05:59+5:302021-11-23T13:18:19+5:30
सांगली : जिल्हा बँकेची निवडणूक दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत ...
सांगली : जिल्हा बँकेचीनिवडणूक दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह आमदार, पक्षांचे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्यात ठाण मांडून होते. बँकेवर प्रदीर्घ काळ जयंत पाटील यांची सत्ता आहे. यंदा मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली. यानिवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. राष्ट्रवादीने ९, काँग्रेस ५, शिवसेना ३ तर भाजपने ४ जागेवर विजय मिळवला आहे. मिरजेच्या शेतकरी भवनात सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली होती. अखेर निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट होत राष्ट्रवादीने जिल्हा बँकेवरील आपली सत्ता कायम राखली आहे.
यानिवडणुकीत कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जतमधून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सावंत हे मंत्री विश्वजित कदम यांचे मावसभाऊ आहेत. तर, केवळ ५ जागेवर कॉंग्रेसचा विजय झाला आहे. शिवसेनेत या निवडणुकीत ३ जागेवर यश संपादन केले आहे. तर भाजपने ४ जागा जिंकत जिल्हा बँकेच्या राजकारणात दमदार एंन्ट्री केली आहे.
जिल्हा बँकेसाठी यंदा चुरशीने ८५.३१ टक्के मतदान झाले होते. तर, एकवीसपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. १८ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात उतरले होते. महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल, तर भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात थेट लढत होती.
असे आहेत मतदारसंघ निहाय विजयी उमेदवार
मिरज सोसायटी गट
उमेदवार मिळालेली मते
विशाल पाटील (आघाडी) ५२ विजयी
उमेश पाटील (भाजप) १६
मिरज सोसायटी गटातून महाविकास आघाडीचे विशाल कदम विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार उमेश पाटील यांचा मोठा फरकाने पराभव केला आहे.
आटपाडी सोसायटी गट
उमेदवार मिळालेली मते
तानाजी पाटील (आघाडी) ४० विजयी
राजेंद्रअण्णा देशमुख (भाजप) २९
आटपाडी सोसायटी गटातून आघाडीचे उमेदवार तानाजी पाटील यांनी राजेंद्रअण्णा देशमुख देशमुख यांचा पराभव केला आहे. तानाजी पाटील यांना ४० तर राजेंद्र अण्णा देशमुख यांना २९ मते मिळाली.
कडेगाव सोसायटी गट
उमेदवार मिळालेली मते
मोहनराव कदम (आघाडी) ५३ विजयी
तुकाराम शिंदे (भाजप) ११
कडेगाव सोसायटी गटात मोहनराव कदम यांनी भाजप उमेदवाराला पराभवाची धूळ चारली आहे. मोहनराव कदम यांना ५३ तर तुकाराम शिंदे यांना केवळ ११ मते मिळाली.
तासगाव सोसायटी गट
उमेदवार मिळालेली मते
बी. एस. पाटील (आघाडी) ४१ विजयी
सुनील जाधव (भाजप) २३
प्रताप पाटील (अपक्ष) १५
तासगाव सोसायटी गटात आघाडीचे उमेदवार बी. एस. पाटील विजयी झाले. त्यांना ४१ मते मिळाली. तर विरोधी भाजपचे उमेदवार सुनिल जाधव यांना २३, अपक्ष उमेदवार प्रताप पाटील यांना १५ मते मिळाली.
वाळवा सोसायटी गट
उमेदवार मिळालेली मते
दिलीपतात्या पाटील (आघाडी) १०८ विजयी
भानुदास मोटे (भाजप) २३
वाळवा सोसायटी गटात आघाडीचे उमेदवारदिलीपतात्या पाटील १०८ मते मिळवत विजयी झाले. त्यांनी भाजपचे भानुदास मोटे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मोटे यांना केवळ २३ मते मिळाली.
कवठेमंकाळ सोसायटी गट
उमेदवार मिळालेली मते
अजितराव घोरपडे (आघाडी) ५४ विजयी
विठ्ठल पाटील (अपक्ष) १४
कवठेमंकाळ सोसायटी गटात अजितराव घोरपडे यांनी अपक्ष उमेदवाराचा पराभव केला. घोरपडे यांना ५४ तर विरोधी अपक्ष उमेदवार विठ्ठल पाटील यांना केवळ १४ मते मिळाली
जत सोसायटी गट
उमेदवार मिळालेली मते
प्रकाश जमदाडे (भाजप) ४५ विजयी
विक्रमसिंह सावंत (आघाडी) ४०
जत सोसायटी गटात भाजपचा विजय झाला आहे. भाजप उमेदवार प्रकाश जमदाडे यांनी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांना पराभवाचा धक्का दिला आहे. केवळ ५ मतांनी भाजप उमेदवार प्रकाश जमदाडे यांचा विजय झाला आहे.
महिला राखीव गट
उमेदवार मिळालेली मते
अ जयश्रीताई पाटील (आघाडी) १६८८ विजयी
ब अनिता सगरे (आघाडी) १४०८ विजयी
संगीता खोत (भाजप) ५७९
दीपाली पाटील (भाजप) ४०५
महिला राखीव गटात आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी विजयी पताका रोवली आहे. जयश्रीताई पाटील व अनिता सगरे यांनी भाजप उमेदवार संगीता खोत व दीपाली पाटील यांचा पराभव केला आहे.
अनुसूचित जाती गट
उमेदवार मिळालेली मते
बाळासाहेब होनमोरे 1503 विजयी
रमेश साबळे भाजपचे 548
अनुसूचित जाती गटात महाआघाडीचे विद्यमान संचालक बाळासाहेब होनमोरे 1503-548 मतांनी विजयी. भाजपचे रमेश साबळे पराभूत.
सर्व विजयी उमेदवार
१) विशाल पाटील काँग्रेस/मिरज सोसायटी गट
२) आ.मोहनराव कदम काँग्रेस/कडेगाव सोसायटी गट
३) महेंद्र लाड काँग्रेस/पलूस सोसायटी गट (बिनविरोध)
४) जयश्री मदन पाटील काँग्रेस /महिला गट
५) अनिता सगरे राष्ट्रवादी/महिला गट
६) दिलीप पाटील राष्ट्रवादी/वाळवा सोसायटी गट
७) आ.मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी/शिराळा सोसायटी गट (बिनविरोध)
८) बी एस पाटील राष्ट्रवादी/तासगाव सोसायटी गट
९) प्रकाश जमदाडे भाजपा/जत सोसायटी गट
१०) तानाजी पाटील शिवसेना/आटपाडी सोसायटी गट
११) आ.अनिलभाऊ बाबर शिवसेना/खानापूर सोसायटी गट (बिनविरोध)
१२) अजितराव घोरपडे शिवसेना/कवठेमहांकाळ सोसायटी गट
१३) वैभव शिंदे राष्ट्रवादी/पाणीसंस्था गट
१४) मन्सूर खतीब राष्ट्रवादी/ओबीसी गट
१५) बाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादी /अनुसुचित जाती जमाती गट
१६) राजेंद्र उर्फ चिमण डांगे राष्ट्रवादी/भटक्या जमाती
१७) सुरेश पाटील राष्ट्रवादी/प्रक्रिया गट
१८) पृथ्वीराज पाटील काँग्रेस/पतसंस्था
१९) राहुल महाडिक भाजपा/पतसंस्था
२०) संग्रामसिह देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट
२१) संग्रामससिंह देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट