सांगली : रब्बी पीकविम्यासाठी रविवारी बँका सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 07:19 PM2018-12-29T19:19:45+5:302018-12-29T19:20:59+5:30
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2018-19 या योजनेचा हप्ता भरण्यासाठी रविवार, दि. 30 डिसेंबर 2018 या शासकीय सुट्टीदिवशी पीक विम्याशी संबंधित सर्व बँक शाखा आणि सी. एस. सी केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत.
सांगली : प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2018-19 या योजनेचा हप्ता भरण्यासाठी रविवार, दि. 30 डिसेंबर 2018 या शासकीय सुट्टीदिवशी पीक विम्याशी संबंधित सर्व बँक शाखा आणि सी. एस. सी केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत.
विमा हप्ता भरणाऱ्या कोणत्याही शेतकरी खातेदाराची तक्रार येणार नाही, याची संबंधितांनी याची दक्षता घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी केले आहे.
डॉ. त्रिगुण कुलकर्णी म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2018-19 या योजनेत कर्जदार - बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2018 आहे. याबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत सर्व संबंधित बँक शाखा आणि सी. एस. सी. केंद्रावरून विमा हप्ता भरून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
महसूल विभाग, कृषि विभाग आणि संबंधित विमा कंपनीद्वारे शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येत आहे. चालू वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकरी सहभागास प्रतिसाद आणि निर्धारित मुदतीमध्ये कार्यवाही होण्याकरिता रविवार, दि. 30 डिसेंबर 2018 रोजी रब्बी पीक विमा हप्ता भरून घेण्याकरिता शासकीय सुटीदिवशी पीक विम्यांशी संबंधित सर्व बँक शाखा आणि सी. एस. सी केंद्रे सुरू ठेवाव्यात.