सांगली बाजार तेजीतच, कांद्याने गृहिणींच्या डोळ्यात आणले पाणी, पन्नाशी गाठली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:29 PM2017-11-20T18:29:08+5:302017-11-20T18:44:53+5:30
स्वयंपाकातील महत्वाचा घटक असलेला कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याच्या तयारीत आहे. मुसळधार पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सांगली बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे प्रतिकिलो ५० रुपये दर झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. गवारी व पालेभाज्यांचा दर अजूनही तेजीतच आहे. कोथिंबिरीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.
सांगली : स्वयंपाकातील महत्वाचा घटक असलेला कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याच्या तयारीत आहे. मुसळधार पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सांगली बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे प्रतिकिलो ५० रुपये दर झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. गवारी व पालेभाज्यांचा दर अजूनही तेजीतच आहे. कोथिंबिरीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.
गेल्या दहा महिन्यापासून फळभाज्यांच्या दरात नेहमीच वाढ राहिली आहे. दीड महिन्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना शेतात माल काढताही आला नाही. त्याचा परिणाम बाजारावर झाला.
फळभाज्यांची बाजारात आवक कमी झाल्याने दरात वाढ होत गेली. सर्वच प्रकारच्या फळभाज्यांनी शंभरी ओलांडली होती. पण गेल्या पंधरा दिवसात दर थोडेसे कमी झाले आहेत. गवारी सोडली तर जवळपास सर्वच फळभाज्यांचे दर प्रतिकिलो ८० रुपयांच्या घरात गेले आहेत.
केवळ बटाटा स्वस्त आहे. दोन आठवड्यापूर्वी ४० रुपये दराने विकली जाणारी कोथिंबिरीची पेंडी आता दहा रुपयास विकली जात आहे. पालेभाज्या अजूनही महागच आहे. पालक, मेथी, तांदळ, लाल माठची पेंडी २० ते ३० रुपये दराने विक्री सुरु आहे.
टोमॅटोचा दर ४० रुपयांवरुन ८० रुपयांवर गेला आहे. बाजारात डाळींचाची आवक वाढली आहे. मोसंबी ६० रुपये, सीताफळ ७० रुपये व सफरचंदाची विक्री ८० रुपये किलो दराने होत आहे. केळीचा दर मात्र ३५ रुपये डझन स्थिर आहे.
फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो)
वांगी : ७० ते ८०
भेनडी : ६० ते ७०
हिरवी मिरची : ७० ते ८०
टोमॅटो : ७० ते ८०
पडवळ : ७० ते ८०
भोपळा : २० रुपये नग
दोडका : ८० ते ९०
बटाटा : १५ ते २०
कांदा : ४० ते ५०
गवारी १०० ते ११०
आले : ७० ते ८०
कार्ली : ८० ते ९०
ढबू मिरची : ६० ते ७०
काकडी : ७० ते ८०
कोबी : ७० ते ८०
प्लॉवर : ७० ते ८०
लूसण : ५० ते ६०
हिरवा वाटाणा : १०० ते १२०
गाजर : ७० ते ८०