फटाक्यांच्या आतषबाजीत उजळली सांगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 11:33 PM2017-10-19T23:33:48+5:302017-10-19T23:33:52+5:30

Sangli blasts fireworks fireworks | फटाक्यांच्या आतषबाजीत उजळली सांगली

फटाक्यांच्या आतषबाजीत उजळली सांगली

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : समृद्धीचा मंत्र जपत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहाच्या खळाळत्या लाटांनी गुरुवारी सांगली शहरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. रांगोळी, फुला-पानांची आरास, लक्ष दिव्यांनी उजळलेले शहर आणि त्याच्या थाटात भर टाकण्यासाठी केलेल्या फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत सांगलीकरांनी सणाचा आनंद लुटला.
दीपावलीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. रविवारी जिल्ह्यासह शहरात दिवसभर लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू होती. कुटुंबासह व्यवसायात स्थिरता, आर्थिक स्थैर्य देणाºया लक्ष्मीचा वरदहस्त कायम रहावा, या प्रार्थनेसह जोरदार आतषबाजी करत शहरात रविवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. लक्ष्मी पूजनावेळी दिव्यांचा झगमगाट, फुलांचा सुवास, उदबत्तीचा घमघमाट याने प्रसन्न वातावरणाची निर्मिती केली. खास दिवाळीसाठी खरेदी केलेले नवीन कपडे, दागिने घालून घराघरांत नव्या नवलाईनेही वास केला होता. घरातील सोने, चांदी, पैशाचीही पूजा करण्यात आली. लक्ष्मी पूजनादिवशी केरसुणीला लक्ष्मीचेच स्थान दिले जाते. त्यामुळे आज त्याचीही खरेदी करण्यात आली. अनेकांची दिवाळी खरेदी आधीच झाली असली, तरी आजही खरेदी करणाºयांची संख्या कमी नव्हती. आजच्या खरेदीत आयत्या वेळची धावपळ जाणवत होती.
व्यावसायिकांनी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी दारावर लावलेल्या फुलांच्या तोरणांमुळे पेठेतील उत्सवात रंग भरला. सायंकाळी दुकानदारांनी दुकानात पूजा केली. रात्री आठच्या सुमारास घराघरांत, दुकानात लक्ष्मी पूजन झाले. त्यानंतर शहरात सर्वत्र जोरदार आतषबाजीने उत्सव साजरा करण्यात आला.
वाहतुकीची कोंडी
सांगलीच्या हरभट रोड, शिवाजी मंडई, टिळक चौक, कापड पेठ या मुख्य बाजारपेठांमधील रस्त्यांवर दिवसभर वाहतुकीची कोंडी होती. नागरिकांनाही वाहनांचे पार्किंग कुठे करायचे, असा प्रश्न पडला होता. दरवर्षी ही परिस्थिती निर्माण होते. ं

Web Title: Sangli blasts fireworks fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.