Sangli: सुदानमधील गृहयुध्दात सांगली जिल्ह्यातील नागरिक अडकले, सुटकेसाठी भारत सरकारकडे साकडे
By शरद जाधव | Published: April 27, 2023 11:37 AM2023-04-27T11:37:19+5:302023-04-27T11:37:24+5:30
Sangli News: आफ्रिका खंडातील सुदान या देशात गेल्या काही दिवसांपासून गृहयुध्दाला सुरूवात झाली आहे. या देशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढत मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे.
- शरद जाधव
सांगली : आफ्रिका खंडातील सुदान या देशात गेल्या काही दिवसांपासून गृहयुध्दाला सुरूवात झाली आहे. या देशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढत मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. याच सुदानमधील साखर कारखान्यांमध्ये कामासाठी गेलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकही अडकल्याची शक्यता आहे. यात पलूस आणि तासगाव तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे.
सुदानमध्ये गृहयुध्द भडकतच चालल्याने अनेक भारतीय तिथे अडकून पडले आहेत. यातील ३६० हून अधिकजणांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे तर अनेकजण सुटकेच्या प्रतिक्षेत आहेत. यात सांगली जिल्ह्यातीलही काही नागरिकांचा समावेश आहे.
सुर्यगाव (ता. पलूस) येथील मधुकर पाटील यांच्या कुटुंबातील तीन व्यक्ती सुदान मध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदानमधील केनाना शुगर कंपनीमध्ये हे सर्वजण कार्यरत आहेत. भारतीय दुतावासाच्यावतीने सुरू असलेल्या मदत क्षेत्रापासून ते अद्यापही बाराशे किलोमीटरवर असल्याची माहिती आहे. यामुळेच त्यांनी एक व्हिडीओ करून सुदानमधून सुटकेची मागणी भारत सरकारकडे केली आहे.