बाप्पांच्या स्वागतासाठी सांगली नगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:33+5:302021-09-10T04:32:33+5:30

सांगली : भक्तीचे फुललेले मळे... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... उत्सवाचा पारंपरिक थाट घेऊन गणरायाची नगरी बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. ...

Sangli city ready for Bappa's reception | बाप्पांच्या स्वागतासाठी सांगली नगरी सज्ज

बाप्पांच्या स्वागतासाठी सांगली नगरी सज्ज

Next

सांगली : भक्तीचे फुललेले मळे... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... उत्सवाचा पारंपरिक थाट घेऊन गणरायाची नगरी बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. संकटांच्या लाटांमधून सावरत बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी जगण्याची नवी उर्मी घेऊन यंदाचा गणेशोत्सव आला आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे आनंदलहरींवर स्वार होत नागरिकांनी उत्सवाची तयारी पूर्ण केली आहे.

‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत शुक्रवारी घरगुती व सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना होत आहे. सुंदर आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट, सडा-रांगोळी, धूप-अगरबत्तींचा घमघमाट अशा वातावरणात ‘श्रीं’चे आगमन सर्वत्र होत आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सांगलीच्या बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या. सांगलीच्या मारुती रोड, मारुती चौक, हरभट रोड, बालाजी चौक, कापड पेठ आदी ठिकाणी खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगलीत गणेशमूर्ती, आरास, पूजा साहित्य, विद्युत माळांचे स्टॉल्स् सजले आहेत. हरभट रोड ते मारुती चौक पूर्णपणे स्टॉल्सनी भरुन गेला आहे. शुक्रवारीही गणरायाच्या आगमनावेळी दिवसभर बाजारपेठेत गर्दी होणार आहे.

चौकट

फुलांनी खाल्ला भाव (प्रतिकिलो)

फुले दर

निशिगंध ६५०

गलांडा १६०

झेंडू ८०

शेवंती २००

कमळ ५० नग

जर्बेरा १५ रु. नग

गजरा २० रु. लड

चौकट

पूजा साहित्याचे दर

नारळ २०-२५

केळी ३०-३५

फळे ३० रु. ५ नग

उदबत्ती १०-२५० रु

धूप २०-५०

पाने १० रु. ला २०

केवडा २० रु पान

चौकट

आरास साहित्य दर

साहित्य दर

मखर ३०० ते १५००

मोत्यांचे हार ४०-७००

विद्युत माळा ८० ते ७००

आसन वस्त्र ४०-६०

चौकट

मूर्तींच्या दरात काहीअंशी वाढ

सर्वत्र गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्ती दरात काहीअंशी वाढ झाली आहे. बाजारात ३५० पासून ५ हजार रुपयांपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत. शाडू मूर्तींचे दरही ३५० ते २५०० रुपयांच्या घरात आहेत.

कोट

फुलांच्या दरात गेल्या दोन दिवसांत वाढ झाली आहे. आगामी ११ दिवस हे दर स्थिर राहतील किंवा यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

- शंकर देवमारे, फूल विक्रेते, सांगली

कोट

यंदा बाजारात उत्साह दिसत आहे. दरवर्षी आम्ही हारांचा स्टॉल लावतो. मागील वर्षाइतका प्रतिसाद यंदाही आहे. उत्सवाने काही प्रमाणात तारले आहे.

- सुशांत चव्हाण, विक्रेते, सांगली

Web Title: Sangli city ready for Bappa's reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.