सांगलीत महाविद्यालयीन विद्यार्थीनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 02:55 PM2018-10-04T14:55:46+5:302018-10-04T17:10:30+5:30
विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थीनीने मुलींच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. घटनेची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद आहे.
सांगली : विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थीनीने मुलींच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. घटनेची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद आहे.
अक्षता कोष्टी वालचंद महाविद्यालयात स्थापत्य अभियंता पद्विकेच्या पहिल्या वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयातील वसतीगृहात राहत होती. तिच्या खोलीत आणखी सहा मुली राहतात. सोमवारी सकाळी सहापैकी काही मुली महाविद्यालयात, तरी काहीजणी क्लासला गेल्या होत्या. खोलीत अक्षता एकटीच होती. त्यावेळी तिने खोलीचा दरवाजा उघडा ठेऊन पंख्याला ओढणीने गळफास लाऊन घेतला.
साडेअकरा वाजता खोलीतील एक मुलगी क्लासमधून आली. खोलीचा दरवाजा उघडा असल्याने ती थेट आत गेली. त्यावेळी अक्षताचा मृतदेह गळफासाने लटकत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून तिने आरडाओरड केली. तिच्या आवाजाने वसतिगृहातील मुलींनी धाव घेतली. महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यपकही आले. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना पाचारण करण्यात आले.
अक्षताची बहिण सांगलीतच शिक्षणानिमित्त राहते. पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधून बोलावून घेतले. पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करण्यात आली. या घटनेचे वृत्त समजताच अक्षताचे आई-वडील व अन्य नातेवाईक दाखल रुग्णालयात दाखल झाले होते. सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.
मोबाईलवर गाणी
आत्महत्या करण्यापूर्वी अक्षताने मोबाईलवर गाणी लावली होती. तिने आत्महत्या केल्यानंतरही गाणी तशीच सुरु होती, असे तिच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले. अक्षताच्या वडिलांचे डफळापुरात किराणा मालाचे मोठे दुकान आहे. पोलिसांनी तिच्या खोलीची झडती घेतली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली आहे का, याचा शोध घेतला. पण काहीच सापडले नाही.