सांगली : संप कालावधीत रूग्णांच्या सोयीसाठी औषध दुकाने सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 05:07 PM2018-09-27T17:07:48+5:302018-09-27T17:10:12+5:30
28 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतभर औषध दुकाने बंद ठेवण्याचे ठरविले आहे. संपामुळे रूग्ण, नातेवाईकांना त्रास होवू नये यासाठी औषध दुकाने नियमितपणे सुरू ठेवून संघटनेव्दारे पुकारलेल्या बंद आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन वि. वि. पाटील यांनी केले आहे.
सांगली: आखिल भारतीय औषध विक्रेतस संघटना यांनी इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्री व ई-पोर्टल प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे व दिनांक 28 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतभर औषध दुकाने बंद ठेवण्याचे ठरविले आहे. संपामुळे रूग्ण, नातेवाईकांना त्रास होवू नये यासाठी औषध दुकाने नियमितपणे सुरू ठेवून संघटनेव्दारे पुकारलेल्या बंद आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त वि. वि. पाटील यांनी केले आहे.
सहाय्यक आयुक्त वि. वि. पाटील म्हणाले, दिनांक 28 सप्टेंबर रोजी सर्व जनतेस औषधे सुरळीत मिळण्याकामी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांना पुरेसा औषधसाठा करण्यास कळविले आहे. संप कालावधीत औषधे उपलब्धतेबाबत काही अडचणी आल्यास 9422034080 या क्रमांकावर किंवा औषध निरीक्षक नि. पा. भांडारकर (मो.क्र. 9423106923) यांच्याशी संपर्क साधावा.
पुढील औषध दुकाने दिनांक 28 सप्टेंबर रोजी चालू राहण्याची शक्यता आहे. औषध उपलब्धतेबाबत या पेढीस संपर्क केल्यास औषधे उपलब्ध केली जातील.
मे राजेंद्र डिस्ट्रिब्युटर्स सांगली (9730045000), मे. साची डिस्ट्रिब्युटर सांगली (9422040600), मे. सदिच्छा मेडीकल ॲण्ड एजन्सी सांगली (9422616071), मे. एस. पी. सेल्स सांगली (9822544699), मे. बालाजी मेडीकल ॲण्ड जनरल स्टोअर्स सांगली (9850677778), मे. शिवशांती मेडीकल सांगली (9421174077), मे. विशाल मेडिकल मिरज (9822617939), मे. केतन एजन्सीज मिरज (9422040254, 0233-2211454), मे. वितराग मेडिको मिरज (9421280000, 0233-211287), मे. श्रध्दा डिस्ट्रिब्युटर्स मिरज (9890898987), मे. कल्पतरू मेडिको दुधगाव, ता. मिरज (9403964220), मे. स्वराज्य मेडीकल ॲण्ड डिस्ट्री, मालगाव, ता. मिरज, मे. शिवराज मेडीकल आटपाडी (9421931421), मे. अमिर मेडीकल खरसुंडी, ता. आटपाडी (9421124458, 9868837949), मे. कुंदन लुगडे मेडिकल्स तासगाव (9860027400), मे. ओंकार मेडीकल तासगाव (9730040866), मे. सन्मती मेडीकल तासगाव (9096140232), मे. अमृतवेल मेडीकल विटा (9730041717), मे. जयभवानी मेडीकल एजन्सी विटा (9673470007, 02347-280018), मे. कल्पना मेडीकल गार्डी, ता. खानापूर (9422041880), मे. अजिंक्य फार्मा कवठेमहांकाळ (9975337400), मे. दत्त मेडीकल स्टोअर्स कवठेमहांकाळ (9421129083), मे. वैशाली मेडीकल ॲण्ड जनरल स्टोअर्स कुंडल (9403782444), मे. त्रिमुर्ती मेडीकल रामानंदनगर, ता. पलूस (8275031850), मे. शिवशंकर मेडीकल स्टोअर्स शेगांव ता. जत (9423031984), मे. जत मेडीकल स्टोअर्स जत (9921114961), मे. मनिषा मेडीकल मेन रोड वांगी, ता. कडेगाव (9960149014), मे. श्री मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स एसटी स्टॅण्डजवळ शिराळा (7588588309), मे. शिवराज मेडीकल ॲण्ड जनरल स्टोअर्स शिराळा (9860432190, 02345-270027), मे. युनिकेअर फार्मस्युटिकल्स इस्लामपूर ता. वाळवा (9850032432), मे. सुशांत मेडीकल स्टोअर्स चिकोर्डी ता. वाळवा (9811765785, 02342-259043), मे. सोना मेडीको आष्टा ता. वाळवा (9822228003), भारती हॉस्पिटल मेडीकल स्टोअर सांगली (9975798880, 9623239096, 9421407029), जीवनधारा मेडीकल मिरज (8446464466), जागृत मेडीकल स्टोअर सिव्हिल हॉस्पिटल सांगली, वॉनलेस हॉस्पिटल मेडीकल स्टोअर मिरज (9503170969), आटपाडी स्वस्त औषधी सेवा जेनरीक मेडीसीन (9730709899), दिघंची स्वस्त औषधी सेवा जेनरीक मेडीसीन (9921815194), गणेश स्वस्त औषधी सेवा जेनरीक पलूस (8421630317), प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र चरण, ता. शिराळा (9960983653), प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सोनी (9823512177), प्रकाश मेडीकल स्टोअर्स उरण इस्लामपूर (9552726500), प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र इस्लामपूर (8805553937), वियजनगर स्वसत औषधी सेवा जेनरीक मेडीसीन शॉपी विजयनगर (9960020092), श्री. सदगुरू स्वस्त औषधी सेवा आणि जेनरीक मेडीसीन शॉपी संजयनगर सांगली (9421127085), विश्रामबाग स्वस्त औषधी सेवा आणि जेनरीक मेडीसीन स्टोअर विश्रामबाग सांगली (9423268720).