सांगली महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, अंतिम रचना दोन मे रोजी प्रसिध्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:42 PM2018-03-20T14:42:22+5:302018-03-20T14:42:22+5:30
सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचना मंगळवारी सकाळी येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात जाहिर करण्यात आली.
सांगली : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रभाग रचना मंगळवारी सकाळी येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात जाहिर करण्यात आली.
यावेळी ओबीसी पुरूष आणि आणि महिलांसाठी राखीव प्रभाग आरक्षणासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये सोडत काढण्यात आली. या निवडणुकीसाठी प्रथमच चार नगरसेवकांचा एक प्रभाग निश्चित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार अंतिम प्रभाग रचना दोन मे रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत तसेच हरकती सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करून मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली, त्याला निवडणूक आयोगाने १३ मार्च रोजीच मान्यता दिली आहे.
सोडतीदरम्यान, आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभाग निहाय काढल्या जाणाऱ्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आले होते. आरक्षण पध्दत लगेच लाईव्ह दाखविण्यात येत होते. ही सर्व प्रक्रिया आॅन कॅमेरा सुरु होती.
अंतिम रचना २ मे रोजी
दि. २0 मार्च रोजी प्रारूप आराखडा जाहीर करून नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाठी सोडत काढणे, २३ मार्च प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर करणे, २३ मार्च ते चार एप्रिल प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना घेणे, १६ एप्रिल रोजी हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे, २३ एप्रिल पर्यंत प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, २७ एप्रिल निर्णय देणे, दोन मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे, असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
अशी आहे प्रभाग रचना
या महापालिकेसाठी प्रभागाची सुरूवात कुपवाडपासून होते. कुपवाड- मिरज - सांगली अशी ही रचना असून गतवेळीइतकीच यंदाची नगरसेवकांची संख्याही ७८ इतकीच राहणार आहे. सर्वसाधारण गटासाठी ४५ जागा निश्चित केल्या असून सर्व साधारण पुरूष गटासाठी २२, ओबीसी महिलांसाठी २१, त्यापैकी ११ महिला अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवल्या आहेत.
विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग एकत्र करण्यात आले आहेत. महापौर- राजेश नाईक, नायकवडी- बागवान, उपमहापौर घाडगे, प्रशांत पाटील, धनपाल खोत एकत्र यांचा समावेश त्यात आहे. सांगलीवाडी व मिरजेतील उत्तमनगर प्रभाग ३ सदस्यीय करण्यात आले आहेत. तीन सदस्यीय प्रभाग हा १७ ते २० हजार संख्येचा तर चार सदस्यीय प्रभाग २५ ते २८ हजार संख्येचा राहणार आहे.
प्रभाग क्रमांक - १
अ- अनुसूचित जाती , ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क- सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - २
अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण पुरूष, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - ३
अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष , क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - ४
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - ५
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला, ड--सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - ६
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - ७
अ-अनुसूचित जाती , ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - ८
अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण पुरूष, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - ९
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - १0
अ-अनुसूचित जाती , ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण महिला, ड--सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक -११
अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - १२
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - १३
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण पुरूष,
प्रभाग क्रमांक - १४
अ-अनुसूचित जाती, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क- सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - १५
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क- सर्वसाधारण महिला, ड--सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - १६
अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - १७
अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब- सर्वसाधारण महिला, क-सर्वसाधारण पुरूष, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - १८
अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण पुरूष, ड-सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - १९
अ-अनुसूचित जाती महिला, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क-सर्वसाधारण पुरूष, ड - सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक - २0
अ- अनुसूचित जाती, ब-अनुसूचित जमाती महिला, क-सर्वसाधारण महिला,