..अन् डॉक्टरांच्या लक्षात आलं, अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या कर्नाटकातील तरुणावर सांगलीत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 02:00 PM2022-03-14T14:00:28+5:302022-03-14T14:09:35+5:30

ती गरोदर राहिल्यानंतर माहेरच्या लोकांनी प्रसूतीसाठी तिला सांगलीत आणले होते. दोन दिवसांपूर्वी ती शासकीय रुग्णालयात प्रसूत झाली. यावेळी ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

Sangli crime against a young man from Karnataka for marrying a minor girl | ..अन् डॉक्टरांच्या लक्षात आलं, अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या कर्नाटकातील तरुणावर सांगलीत गुन्हा

..अन् डॉक्टरांच्या लक्षात आलं, अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या कर्नाटकातील तरुणावर सांगलीत गुन्हा

Next

सांगली : अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या तरुणाविरोधात सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मल्हारी महादेव बडची (रा. ऐनगळी, ता. अथणी) असे तरुणाचे नाव असून, अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित बडची हा कर्नाटकातील असून, २०१९ मध्ये त्याची शहरातील एका उपनगरातील अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. त्यावेळी संबंधित मुलीचे १४ वर्षे वय होते. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही बडची याने तिच्याशी विवाह केला. त्यानंतर ती बडची याच्यासोबत राहत होती.

ती गरोदर राहिल्यानंतर माहेरच्या लोकांनी प्रसूतीसाठी तिला सांगलीत आणले होते. दोन दिवसांपूर्वी ती शासकीय रुग्णालयात प्रसूत झाली. यावेळी ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शहर पोलिसांनी संशयित बडची याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Sangli crime against a young man from Karnataka for marrying a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.