सांगली : अंकलगीतील बेपत्ता तरुणाच्या आजीचा मृत्यू, अन्न-पाणी होते सोडले, गावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:56 PM2017-12-22T13:56:51+5:302017-12-22T14:05:42+5:30

अंकलगी (ता. जत) येथील गेल्या दोन महिन्यांपासून अपहरण झालेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट (वय ३५) याचा शोध लागत नसल्याने, याचा धसका घेऊन गेला महिनाभर अन्न ग्रहण न केल्याने त्याची आजी भौरव्वा शिवमूूूूर्ती आरळी यांचे निधन झाले.

Sangli: The death of grandfather of unidentified youth, leaving food and water, tension in the village | सांगली : अंकलगीतील बेपत्ता तरुणाच्या आजीचा मृत्यू, अन्न-पाणी होते सोडले, गावात तणाव

सांगली : अंकलगीतील बेपत्ता तरुणाच्या आजीचा मृत्यू, अन्न-पाणी होते सोडले, गावात तणाव

Next
ठळक मुद्देअपहरणातील संशयित आरोपी तानाजी चिदानंद कोळी याच्यावर कारवाईची मागणीधसका घेऊन अन्न ग्रहण न केल्याने आजी भौरव्वा यांचे निधन

संख/माडग्याळ : अंकलगी (ता. जत) येथील गेल्या दोन महिन्यांपासून अपहरण झालेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट (वय ३५) याचा शोध लागत नसल्याने, याचा धसका घेऊन गेला महिनाभर अन्न ग्रहण न केल्याने त्याची आजी भौरव्वा शिवमूूूूर्ती आरळी यांचे निधन झाले.

संंतप्त ग्रामस्थांनी त्यांचा अंंत्यविधी न करता मृृतदेह उमदी पोलिस ठाण्यासमोर नेण्याचा पवित्रा घेतला. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी पोलिसांनी समजूत घातल्याने दुुपारी उशिरा अंंत्यविधी उरकण्यात आला.

पूर्व भागातील अंकलगी येथील शेतमजूर असलेला राघवेंद्र संगाप्पा अक्कलकोट याला २६ आॅक्टोबरला शेजारील तानाजी चिदानंद कोळी यांनी, संख येथे जाऊन येऊ म्हणून नेले आहे. तेव्हापासून तो गायब झाला आहे. याबाबत उमदी पोलिस ठाण्यामध्ये गायब झाल्याची फिर्याद भाऊ सुरेश अक्कलकोट यांनी दिली आहे.

पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्यावर जुजबी कारवाई करण्यात आली आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यांनी गावातील मुकादम म्हाळाप्पा मलकाप्पा अजमाने यांच्या ताब्यात दिले आहे, असे सांगितले आहे. कोळी हा अजमानेकडे ऊस तोडणी मजूर म्हणून काम करीत आहे. कऱ्हाड येथे घेऊन गेला आहे, असा जबाब दिला आहे; पण आजतागायत तो बेपत्ता आहे.

राघवेंद्र याचे मोबाईल लोकेशन व तानाजी कोळी यांच्या मोबाईल लोकेशनवरून, बेपत्ताचे लोकेशन दोन दिवसात कºहाड दाखविते. त्यामुळे संशय वाढला होता. यापूर्वी ग्रामस्थांनी उमदी पोलिस ठाण्यावर १८ नोव्हेंबरला मोर्चा काढला होता. त्यावेळी मंगळवारपर्यंत शोध घेतो, असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

संशयित आरोपीस अटक करून लगेच सुटका केली आहे. त्यांनी गावात येऊन राघवेंद्रप्रमाणे कुटुंबातील अन्य मुलांचेही अपहरण करण्याची धमकी दिली आहे. गावातील पालकही दहशतीखाली होते. पोलिसांच्या मतानुसार, आरोपी गुन्हा कबूल करत नाहीत. त्यामुळे तपास रखडला आह असे पोलिसांचे मत आहे.

कारवाईची मागणी

अपहरणातील संशयित आरोपी तानाजी चिदानंद कोळी याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन केले. सलग दोन दिवस पालकांनी मुलांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होत्या.

Web Title: Sangli: The death of grandfather of unidentified youth, leaving food and water, tension in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.