सांगली जिल्ह्यात सरासरी ३.९० मि.मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 04:41 PM2019-07-25T16:41:42+5:302019-07-25T16:43:15+5:30

जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी ३.९० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कडेगाव तालुक्यात सर्वाधिक ८.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

Sangli district has an average area of 0.99 mm. Rainfall record | सांगली जिल्ह्यात सरासरी ३.९० मि.मी. पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यात सरासरी ३.९० मि.मी. पावसाची नोंद

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात सरासरी ३.९० मि.मी. पावसाची नोंदवारणा धरणात २१.५४ टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी ३.९० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कडेगाव तालुक्यात सर्वाधिक ८.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ६.८, जत २.३, खानापूर-विटा ८, वाळवा-इस्लामपूर २.५, तासगाव ०.५, शिराळा ६, आटपाडी ३.३, कवठेमहांकाळ - निरंक, पलूस २.८, कडेगाव ८.६.

वारणा धरणात २१.५४ टी.एम.सी. पाणीसाठा
    
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 21.54 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये ५१.५० टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 5.04 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 5.88 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 11.85 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 6.58 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 114.90 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 5.6 (45), आयर्विन पूल सांगली 6 (40) व अंकली पूल हरिपूर 6.3 (45.11).
 

 

Web Title: Sangli district has an average area of 0.99 mm. Rainfall record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.