सांगली जिल्ह्यात 1 लाख 34 हजारहून अधिक व्यक्ती, 30 हजारांहून अधिक जनावरांचे पुनर्वसन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 04:15 PM2019-08-09T16:15:18+5:302019-08-09T16:15:30+5:30
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सुमारे 26 हजार 593 कुटुंबांतील 1 लाख 34 हजार 363 लोक व 30 हजार 692 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मिरज तालुक्यातील 20 गावांतील 4 हजार 134 कुटुंबांतील 21 हजार 884 लोक व 6 हजार 334 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 22 गावांतील 5 हजार 328 कुटुंबांतील 25 हजार 245 लोक व 6 हजार 196 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 36 गावांतील 12 हजार 215 कुटुंबांतील 65 हजार 383 लोक व 15 हजार 117 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 20 गावांतील 500 कुटुंबांतील 2 हजार 273 लोक व 2 हजार 590 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 416 कुटुंबांतील 19 हजार 578 लोक व 455 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.
मिरज तालुक्यातील बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, मौजे डिग्रज, ढवळी, वाळवा तालुक्यातील शिरगाव, भरतवाडी, पलूस तालुक्यातील भिलवडी, तावदरवाडी, सुखवाडी, राडेवाडी, सूर्यगाव, तुपारी, बुर्ली, नागराळे, दह्यारी, घोगाव, पुणदी तर्फे वाळवा, पुणदीवाडी, अनुगडेवाडी, आमणापूर, चोपडेवाडी, खटाव, ब्रम्हनाळ, नागठाणे, दुधोंडी, अंकलखोप या गावांचा संपर्क तुटला असून स्थलांतरण सुरू आहे.