सांगली जिल्ह्याच्या शिवसेनेत पुन्हा धुसफूस, नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:05 PM2018-08-18T17:05:30+5:302018-08-18T17:08:38+5:30
गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत असलेली धुसफूस महापालिका निवडुकीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. महापालिकेत एकही जागा न जिंकू शकलेल्या शिवसेनेमध्ये याबाबतचे खापर एकमेकांवर फोडण्याचे काम आता सुरू झाला आहे.
सांगली : गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत असलेली धुसफूस महापालिका निवडुकीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. महापालिकेत एकही जागा न जिंकू शकलेल्या शिवसेनेमध्ये याबाबतचे खापर एकमेकांवर फोडण्याचे काम आता सुरू झाला आहे. काहींनी उघडपणे तर काहींनी छुप्या पद्धतीने तक्रारी सुरू केल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील शिवसेनेत गटबाजी मोठी आहे. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न या गटबाजीपासून सुरू होतो. त्यामुळे अनेकदा राज्यातील दिग्गज नेत्यांनी याबाबत प्रयत्न करूनही गटबाजी थोपविण्यात त्यांना यश आले नाही. कधी जाहीर सभांमध्ये, पक्षीय बैठकांमध्ये तर कधी आंदोलनांमध्येही गटबाजीचे दर्शन घडले.
महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ही गटबाजी संपल्याचे चित्र भासविण्यात आले. वास्तविक पवार गटाने घेतलेल्या फारकतीमुळे निवडणुकीच्या प्रारंभालाच गटबाजीचा नारळ फुटला होता. त्यानंतरही प्रचारकार्यातही स्थानिक नेत्यांची ताकद फारशी लागली नाही. त्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत भोपळा हाती लागला. एकही सदस्य निवडून न आल्याने मोठी नामुष्की त्यांच्या पदरात पडली.
अपयशाचे खापर आता कोणावर फोडायचे याचा विचार करून एकमेकांना दोष देण्यात धन्यता मानली जात आहे. काहींनी उघडपणे पदाधिकाऱ्यांबद्दल तक्रारी केल्या तर काहींनी छुप्या पद्धतीने पक्षीय नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे ही धुसफूस आता वाढली आहे.
वास्तविक दोन्ही जिल्हाप्रमुख हे ग्रामीण भागातून आलेले असल्यामुळे त्यांना शहराच्या रणनितीविषयी अंदाज आला नाही, असेही मत मांडले जात आहे. तरीही शहरी भागातील पदाधिकाऱ्यांनाही याबाबत फारसा जोर लावता आला नाही. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही ठिकाणच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना या अपयशाबद्दल पक्षाकडून जबाबदार धरले जाऊ शकते.
जिल्हाप्रमुखांबद्दल तक्रार
शिवसेनेचीच शाखा असणाऱ्या अवजड वाहतूक सेनेने याबद्दल जिल्हाप्रमुख संजय विभुते आणि महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेबद्दल तक्रार केली आहे. यासंदर्भात या संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र कोळी यांनी प्रसिद्धीपत्रक काढून विरोध नोंदविला आहे. पक्षाकडेही याबाबत तक्रार केली आहे. त्यांचे राजीनामे घेऊन अन्य लोकांना संधी देण्याची म