सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७.२२ टक्के;तेरा टक्क्याने निकाल वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 06:26 PM2020-07-29T18:26:17+5:302020-07-29T18:30:02+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा ९७.२२ टक्के निकाल लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत १३.४ टक्क्याने निकालात वाढ झाली आहे.
सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा ९७.२२ टक्के निकाल लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत १३.४ टक्क्याने निकालात वाढ झाली आहे.
सर्वाधिक ९८.४२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांनी पुन्हा बाजी मारली आहे. कडेगाव तालुक्याची बारावीनंतर पुन्हा दहावीमध्येही सर्वाधिक ९९.१५ टक्के निकालाची नोंद झाली.
मागील पंधरा दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
यंदा निकाल पंधरा दिवस उशिरा लागला. बुधवारी आॅनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यंदा नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली. सांगली जिल्ह्याचा ९७.२२ टक्के निकाल लागल्याने कोल्हापूर विभागात जिल्ह्याला तिसरे स्थान मिळाले.