पश्चिम महाराष्टत सांगली जिल्हा सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:00 PM2020-05-29T17:00:49+5:302020-05-29T17:06:24+5:30

कोरोनाच्या नियंत्रणाचे सर्वाधिक श्रेय जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या काटेकोर नियोजनाला जाते. महसूल, पोलिस, आरोग्य, जिल्हा परिषद, शासकीय रुग्णालय, प्रयोगशाळा, कोविड रुग्णालय या सर्व यंत्रणांत समन्वय आणि सुसूत्रता असल्याचा हा परिणाम आहे. लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी करताना, नियमांचा जाच होणार नाही, याचीही काळजी घेतली.

Sangli district is safe in western Maharashtra | पश्चिम महाराष्टत सांगली जिल्हा सुरक्षित

अनेक गावांनी बाहेरून येणाऱ्यांचे गावाबाहेरच अलगीकरण केले.

Next
ठळक मुद्देकोरोनाचा फैलाव रोखण्यात यश : प्रशासनाचे चोख नियोजन, सर्व यंत्रणांत समन्वय

श्रीनिवास नागे ।

सांगली : पश्चिम महाराष्टत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना, तुलनेने सांगली जिल्ह्यात मात्र तो नियंत्रणात दिसत आहे. पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्टÑातील जिल्ह्यांसह शेजारच्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातही कोरोनाच्या फैलावाची स्थिती गंभीर आहे. सांगलीत मात्र कोरोना रुग्णसंख्येला शंभरीतच रोखण्यात यश आले आहे.

पश्चिम महाराष्टत पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून, तेथे कोरोनाचे ६७१८ रुग्ण असून, ३०३ दगावले आहेत. सोलापूर जिल्ह्यात ७०९ रुग्ण, ६७ जणांचा मृत्यू, कोल्हापुरात ४२७ रुग्ण, चौघांचा मृत्यू, तर साताऱ्यात ४२२ रुग्ण, असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्हे सांगलीच्या शेजारी असून, कर्नाटकातील विजयपूर आणि बेळगाव यांच्याही सीमा खेटून आहेत. बेळगावात कोरोना रुग्णांची संख्या १३९ आहे. या सर्वांच्या तुलनेत सांगली जिल्हा मात्र सुरक्षित राहिला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे १०१ रुग्ण असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. या तुलनात्मक आकडेवारीवरून जिल्हा अधिक सुरक्षित मानला जात आहे.

कोरोनाच्या नियंत्रणाचे सर्वाधिक श्रेय जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या काटेकोर नियोजनाला जाते. महसूल, पोलिस, आरोग्य, जिल्हा परिषद, शासकीय रुग्णालय, प्रयोगशाळा, कोविड रुग्णालय या सर्व यंत्रणांत समन्वय आणि सुसूत्रता असल्याचा हा परिणाम आहे. लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी करताना, नियमांचा जाच होणार नाही, याचीही काळजी घेतली.


काय आहे ‘सांगली पॅटर्न’
च्जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची तपासणी नाक्यावर तपासणी आणि नोंद.
च्महसूल-आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोना संशयितांचा शोध घेऊन वेळेवर तपासणी.
च्संशयास्पद आढळलेल्यांचे, संपर्कातील ‘हायरिस्क’ नागरिकांचे त्वरित संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन). त्यामुळे

  • स्थानिक प्रसाराला प्रतिबंध.
  • संशयितांची कोरोना चाचणी करून लगेच अहवाल.
  • अहवाल सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि तेथून तो तालुक्याच्या यंत्रणेकडे.
  • रुग्ण आढळलेला परिसर लगेच कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करून सील. तेथे आवश्यक उपाययोजना.
  • संशयिताचा शोध, चाचणी ते उपाययोजना ही प्रक्रिया होते, केवळ तीन ते चार तासात!


संसर्ग रोखला
सर्वप्रथम इस्लामपुरात चार रुग्ण आढळून आले होते. टप्प्याटप्प्याने तेथील रुग्णांची संख्या २७ झाली. मात्र प्रशासनाने बाधितांचा परिसर प्रतिबंधित केला. बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू ठेवला. या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’मुळे संसर्ग रोखता आला.

१०१ कोरोना  रुग्ण-- 03 मृत

 


मी स्वत: वैद्यकीय क्षेत्रातील असल्याचा फायदा झाला. कोरोनाबाधिताचा शोध घेऊन त्याच्यासह त्याच्या संपर्कातील लोकांना लगेच बाहेर काढत आहोत. आरोग्य यंत्रणेकडून सर्वेक्षण सुरू असून, त्यातून लहान मुले-वृद्धांची माहिती समजते. उपचारातील यंत्रणाही उत्तम काम करत आहे.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी


 

Web Title: Sangli district is safe in western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.