सांगली जिल्ह्यात ३० हजार मतदार वाढले , निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात विक्रमी नोंदणी--मतदार दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:26 AM2018-01-25T00:26:28+5:302018-01-25T00:26:42+5:30

सांगली : नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी व लोकशाहीची मूल्ये अधिक परिणामकारकपणे रूजण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश

In Sangli district, there were 30 thousand voters, in the backdrop of elections, record in the municipal corporation - voter day special | सांगली जिल्ह्यात ३० हजार मतदार वाढले , निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात विक्रमी नोंदणी--मतदार दिन विशेष

सांगली जिल्ह्यात ३० हजार मतदार वाढले , निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात विक्रमी नोंदणी--मतदार दिन विशेष

Next

शरद जाधव ।
सांगली : नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी व लोकशाहीची मूल्ये अधिक परिणामकारकपणे रूजण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबरपासून सुरू केलेल्या मतदार नोंदणी अभियानास जिल्हाभर चांगला प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यात ३० हजार ५७३ मतदारांची वाढ झाली आहे.

अवघ्या सहा महिन्यावर आलेल्या महापालिका निवडणुका लक्षात घेता, सर्वाधिक मतदार महापालिका क्षेत्रात वाढले आहेत.मतदारांनी मतदान करणे व आपला अधिकार वापरणे आवश्यक असताना, याबाबत गेल्या काही वर्षात नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत होती. यावर उपाय म्हणून प्रशासनाने मतदानाविषयी व नावनोंदणीविषयी जागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात ३ आॅक्टोबर ते १५ डिसेंबरअखेर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. यात नवमतदारांची नोंदणी, नाव वगळणे व नावात, फोटोत बदल अशी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानुसार आता जिल्ह्यातील पूर्णपणे अद्ययावत मतदारयादी तयार झाली आहे.

जिल्ह्यातील मतदारांत ३० हजार ५७३ ने वाढ झाली असतानाच, सर्वाधिक नवीन नोंदणी सांगली व मिरज मतदारसंघात झाली आहे. मिरज मतदारसंघात ७ हजार ३९६, तर सांगली मतदारसंघात ७ हजार ८३० मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे. मृत मतदार, तसेच स्थलांतरासह इतर कारणांनी ४ हजार ३५० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याअगोदर जिल्ह्यातील मतदारांची संख्या २२ लाख ६४ हजार ६३९ होती. त्यात वाढ होऊन, आता २२ लाख ९० हजार ८६२ मतदार संख्या झाली आहे. नोंदणीअगोदर जिल्ह्यात केवळ ४ तृतीयपंथी मतदार होते, आता जिल्ह्यात ५६ तृतीयपंथी मतदारांनी नोंदणी केली आहे. यापुढेही जिल्ह्यात मतदान नोंदणी सुरुच ठेवण्यात येणार आहे.

निवडणुकीमुळे नोंदणी
महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने त्याची झलक मतदार नोंदणी अभियानात दिसून आली. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वाधिक मतदार नोंदणी सांगली व मिरज आणि कुपवाड मतदारसंघात झाली असून १५ हजार २२६ मतदार नव्याने आगामी निवडणुकीसाठी आपला हक्क बजाविणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारही मतदान जागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत.

सहस्रक मतदारांचा गौरव
मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. आता शुक्रवार दि. २६ रोजी युथ मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याबरोबरच स्टेशन चौकात सायकल रॅली, मानवी साखळी, प्रभात फेरी होणार आहे. तसेच १ जानेवारी २००० ला जन्मलेल्या जिल्ह्यातील ४६ नवमतदारांना सहस्रक मतदार म्हणून गौरविण्यात येणार आहे.
 

जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणीसाठी मोहिमेचे नियोजन करण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असून मतदार संख्येत वाढ झाली आहे. महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेचा विशेष फायदा युथ मतदारांना झाला आहे. यापुढेही मतदारांना सोयी देण्यास प्राधान्य देणार आहे.
- मीनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा)

Web Title: In Sangli district, there were 30 thousand voters, in the backdrop of elections, record in the municipal corporation - voter day special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.