सांगली कारागृहात झोपायला नाही जागा-कैद्यांची संख्या साडेचारशेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 06:18 PM2018-12-01T18:18:38+5:302018-12-01T22:58:32+5:30
वाढत्या गुन्हेगारीमुळे सांगलीचे जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने सातत्याने खचाखच भरत आहे. २३५ क्षमता असलेल्या या कारागृहात
- सचिन लाड
सांगली : वाढत्या गुन्हेगारीमुळे सांगलीचे जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने सातत्याने खचाखच भरत आहे. २३५ क्षमता असलेल्या या कारागृहात कैद्यांच्या संख्येचा आकडा पाचशेच्या दिशेने जात आहे. सध्या ४५२ कैदी आहेत. यामध्ये २२ महिलांचा समावेश आहे.
वाढत्या संख्येमुळे कैद्यांना झोपायला जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्'ातील गुन्हेगारीचा आलेख नेहमी चढ-उताराचा राहिला आहे. गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. त्यामुळे कारागृहात कैद्यांची संख्या वाढत आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि बलात्कार या गुन्तील कैद्यांची संख्या मोठी आहे. दररोज चार-पाच कैदी नव्याने दाखल होत आहेत. पण त्यांचे सुटण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आठवड्यातून तीन ते चार कैदीच जामिनावर बाहेर पडत आहे. कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे कारागृह अपुरे पडत आहे. कारागृह अन्यत्र स्थलांतर करण्याची प्रशासनाची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. राजवाडा चौकात भरवस्तीत हे कारागृह आहे. आजूबाजूला लोकवस्ती व टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. कारागृहात काय सुरू आहे, हे इमारतीमधून सहजपणे दिसून येते. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तीन वर्षापूर्वी कारागृहाच्या तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी कारागृहास भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता. स्थलांतरासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. पण पुढे काहीच झाले नाही. कैद्यांची वाढती संख्या कारागृह प्रशासनाच्याद्दष्टीने धोक्याची घंटा बनली आहे. कैद्यांच्या तुलनेत तेवढी सुरक्षा यंत्रणाही नाही.
सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात नऊशे कैद्यांचा स्वयंपाक करावा लागत आहे. पहाटे तीनपासून स्वयंपाकाचे काम सुरू करावे लागते, तर रात्रीच्या जेवणासाठी दुपारी बारापासूनच स्वयंपाकास सुरुवात होते.
कळंब्यात दीडशे कैदी
खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर गुन्'ातील दोन डझनहून टोळ्यांना गेल्या तीन-चार वर्षांत पकडण्यात आले. यामध्ये दीडशेहून गुंड कायद्याच्या कचाट्यात सापडले. सुरक्षेच्या कारणास्तव या गुंडांना कारागृह प्रशासनाने येथे न ठेवण्याची विनंती न्यायालयास केली. न्यायालयानेही ही विनंती मान्य करून या गुंडांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलविण्याचा आदेश दिला. या गुंडांना सांगली कारागृहात ठेवले असते तर, आज कैद्यांची संख्या सहाशेच्या पुढे गेली असती.