Sangli Election (15860) मतांमध्ये सांगली निवडणुकीत भाजपच नंबर एक काँग्रेस दुसऱ्या स्थानी : राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:23 PM2018-08-03T22:23:27+5:302018-08-03T22:25:46+5:30

महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप मतांच्या आकडेवारीतही नंबर एकच ठरला. भाजपला या निवडणुकीत ३ लाख ६३ हजार मते मिळाली, तर काँग्रेस दुसऱ्या व राष्ट्रवादी

Sangli Election (15860): BJP in Sangli elections, second place to Congress: Nationalist Congress Party | Sangli Election (15860) मतांमध्ये सांगली निवडणुकीत भाजपच नंबर एक काँग्रेस दुसऱ्या स्थानी : राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर

Sangli Election (15860) मतांमध्ये सांगली निवडणुकीत भाजपच नंबर एक काँग्रेस दुसऱ्या स्थानी : राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर

Next

सांगली : महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप मतांच्या आकडेवारीतही नंबर एकच ठरला. भाजपला या निवडणुकीत ३ लाख ६३ हजार मते मिळाली, तर काँग्रेस दुसऱ्या व राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या स्थानावर राहिली. मात्र दोन्ही काँग्रेसच्या एकत्रित मतांची बेरीज भाजपपेक्षा दहा हजाराने अधिक आहे.
महापालिका निवडणुकीसाठी १० लाख ३३ हजार ३९५ मते वैध ठरली होती. यात भाजपला ३ लाख ६३ हजार ९३ मते मिळाली. त्याखालोखाल काँग्रेसला २ लाख १३ हजार ८७७, राष्ट्रवादीला १ लाख ६१ हजार २९ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीला ३ हजार ६६६, माकपला ३३३, मनसेला २४८, जनता दलाला ६ हजार ६७, बहुजन मुक्ती पार्टीला ४२१, भारिप बहुजन महासंघाला १ हजार ३३०, राष्ट्रीय समाज पक्षाला ४५४, तर सुधार समितीला १२ हजार ५२८ मते मिळाली.

शिवसेना, एमआयएमचा अपेक्षाभंग
शिवसेना व एमआयएम हे दोन पक्ष पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरले होते. शिवसेनेने ५८, तर एमआयएमने ८ जागांवर उमेदवार उभे केले होते. यात शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मिळून ३७ हजार २०५, तर एमआयएमला ९ हजार ८५८ मते मिळाली.

अपक्षांचा बोलबाला
या निवडणुकीत १९४ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता इतर राजकीय पक्षांपेक्षा अपक्ष उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. अपक्षांनी १ लाख ६८ हजार ४६१ मते मिळवित मतांच्या आकडेवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली.

नोटाला पसंती
अनेक प्रभागात विजयी व पराभूत उमेदवारांतील अंतर कमी राहिले. त्या प्रभागात नोटाला अधिक मतदान झाले. या निवडणुकीत नोटाला एकूण २५ हजार ४४३ मते मिळाली.

Web Title: Sangli Election (15860): BJP in Sangli elections, second place to Congress: Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.