सांगली : शेतकऱ्यांची पिळवणूक : सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केंद्रांना मुहूर्त नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 08:50 PM2018-10-10T20:50:22+5:302018-10-10T20:51:34+5:30
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याबाबत नियोजन केले होते. मात्र, शेतकऱ्यांकडून
शरद जाधव
सांगली : राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याबाबत नियोजन केले होते. मात्र, शेतकºयांकडून शेतीमालाची नोंदणी करताना आॅनलाईन सात-बारा उतारा सक्तीचा केला जात असल्याने शेतकºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकºयांनी यासंदर्भात बाजार समितीकडे तक्रार केली आहे.
सोयाबीन, उडीद व मुगाचे उत्पादन सुरू झाले आहे. परंतु हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकºयांनी तक्रारी केल्या होत्या. केवळ सोयाबीनला हमीभावापेक्षा शंभर ते सव्वाशे रूपयांपर्यंतचा जादा दर मिळत आहे. उडीद आणि मुगाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. शेतकºयांना हमीभाव मिळावा यासाठी मार्केट यार्डात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी बाजार समितीने जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यानुसार १ ते १० आॅक्टोबरपर्यंत नोंदणी सुरू करण्यात येणार होती. मात्र, शेतकºयांकडून शेतीमालाची नोंदणी करताना आॅनलाईन सात-बारा अनिवार्य करण्यात आला आहे.
राज्याच्या सर्व्हरच्या अडचणीमुळे आॅनलाईन पध्दतीने उतारा मिळण्यास अडचणी येत आहेत. गेल्या आठवड्यात महसूल प्रशासनानेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शेतकºयांची अडचण लक्षात घेता, जिल्हाधिकाºयांनीही शेतकºयांची अडवणूक करू नये असे आदेश दिले आहेत. तरीही नोंदणीसाठी आॅनलाईन सात-बारा उतारा सक्तीचा केला आहे.