सांगली : महापालिकेच्या दारातच पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांना चावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:38 PM2018-05-17T18:38:54+5:302018-05-17T18:38:54+5:30
सांगली महापालिकेच्या मुख्यालयासमोरच गुरूवारी पिसाळलेल्या कुत्र्याने पाच नागरिकांचा चावा घेतला. यात महाविद्यालयीन युवतीस दोन वृध्द महिलांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या डॉग व्हॅनच्या पथकाने कुत्र्याला पकडले.
सांगली : महापालिकेच्या मुख्यालयासमोरच गुरूवारी पिसाळलेल्या कुत्र्याने पाच नागरिकांचा चावा घेतला. यात महाविद्यालयीन युवतीस दोन वृध्द महिलांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या डॉग व्हॅनच्या पथकाने कुत्र्याला पकडले.
सांगली महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. प्रत्येक चौकात कुत्र्याचे कळप आहेत..यापूर्वी कुत्र्याच्या हल्ल्यात लहान मुलांचा बळी गेला आहे. तसेच अनेक जणांचे लचके सुद्धा तोडले आहेत. मात्र महापालिकेला या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे. कुत्र्यांचे लसीकरणही बंद आहे.
महापालिका मुख्यालयासमोर गुरूवारी एका पिसाळलेल्या कुत्र्यांनी ५ जणांना चावले आहे. रस्तावरून महाविद्यालयाकडे जाणर्या मुलीवरही हल्ला केला. तर दोन वृद्ध महिला आणि पुरुषांनाही चावले.. हा सर्व प्रकार हातगाडीवाल्याने पहिला आणि तातडीने महापालिकेशी संपर्क साधला. घटनास्थळी डॉग व्हॅन दाखल झाली आणि या कुत्र्याला ताब्यात घेण्यात आले.