सांगली पूर: ब्रह्मनाळमधल्या बोट दुर्घटनेतील मृतांची नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 03:21 PM2019-08-08T15:21:56+5:302019-08-08T15:31:17+5:30

ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे पुरात अडकलेल्या 32 नागरिकांना बाहेर काढत असताना नाव उलटल्यानं 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

sangli flood: Name of the boat accident in Brahmanal | सांगली पूर: ब्रह्मनाळमधल्या बोट दुर्घटनेतील मृतांची नावं

सांगली पूर: ब्रह्मनाळमधल्या बोट दुर्घटनेतील मृतांची नावं

Next

सांगली : ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे पुरात अडकलेल्या 32 नागरिकांना बाहेर काढत असताना नाव उलटल्यानं 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह सापडले असून इतर 16 जणांचा शोध सुरू आहे. ब्रह्मनाळ येथे कृष्णा आणि येरळा नदीचा संगम होतो. सध्या कृष्णा नदीला महापूर आला असून, ब्रह्मनाळ येथे नदीचे पात्र अक्राळविक्राळ बनले आहे. संपूर्ण ब्रह्मनाळ गावाला महापुराच्या पाण्याने वेढा दिला असून, गावात तीन दिवसांपासून पाणी आहे. गावात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. अनिल गुरव (रा. ब्रह्मनाळ) या युवकाने व त्यांच्या टीमने 6  लोकांना वाचविले. त्यामध्ये 1 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांची नावं समोर आली असून, बेपत्ता असलेल्यांचा शोध घेतला जात आहे. 

१) एक लहान मूल
२) कल्पना रवींद्र कारंडे
३) कस्तुरी बाळासाहेब वडेर
४) पप्पूताई भाऊसाहेब पाटील 
५) लक्ष्मी जयपाल वडेर
६) राजमाती जयपाल चौगुले
७) बाबासाहेब अण्णासाहेब पाटील
८) अनोळखी एकजण

 न सापडलेली व्यक्ती 

१) पिल्लू तानाजी गडदे

दरम्यान, गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या नावेतून नागरिकांना सुरळितस्थळी पोहोचवण्यात येत होते. नावेत क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे 32 जण बसले होते. नाव कडेने गावाबाहेर जात असताना नावेचा पंखा पाण्यातील झाडात आणि पाईपमध्ये अडकला. नावेतील वाढलेले वजन आणि पंखा अडकल्याने नाव उलटली. पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने नावेतील कोणालाच काहीही करता आले नाही. पोहता येणारे दोघे जण पाण्यात झाडाझुडपांना धरून राहिले. मात्र इतर जण बुडाले. बत्तीसपैकी 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी काही पाण्याबरोबर वाहून जाऊन कडेला अडकले होते.

आणखी सोळा जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय पथक बचावकार्यात सहभागी आहे. घटनास्थळी आक्रोश आणि गोंधळ सुरू आहे. गावात आणखी २०० ग्रामस्थ अडकून पडले असून, त्यांच्यासाठी बोटींची सोय अजूनही करण्यात आलेली नाही.

Web Title: sangli flood: Name of the boat accident in Brahmanal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.